व्यापारी मित्र

Website तर झाली, पुढे काय?

Download Article

नमस्कार, व्यापार वृद्धीसाठी Online Marketing या लेखांक मालिकेतील दुसरं सदर आपण पाहतोय. website तर झाली पुढे काय? तर आपण समजून घेऊया कि website म्हणजे नक्की काय?

website म्हणजे काय?

एखाद्या व्यापाराकरिता किंवा एखाद्या उद्योजाकाकरिता website हे दुसरं तिसरं काहीही नसून त्याची विक्री वाढवण्याचं किंवा व्यवसाय वाढवण्याचं हे एक नवीन माध्यम असतं; सुरवातीला हे आपण स्पष्ट समजून घेऊया. तेव्हा website हे दुसरं तिसरं काही नसून तुमचा internet वरचा catalogue आहे, असंच समजूया थोडक्यात. अगदी सोप्प्या भाषेत किंवा खूप सुंदर पद्धतीने केलं तर ते पुस्तकासारखं तयार होईल.

पण नक्कीच website म्हणजे तुमच्या व्यवसायाविषयी बोलणाऱ्या पत्रकांचे एक collection किंवा एक एकत्रीकरण करून ठेवलेलं कागदपत्राचे स्वरूप असंच त्याला म्हणता येईल. त्यात काही चित्रे असतील, काही videos असतील काही नुसतेच लेख असतील काही त्यात ‘price list’ – ज्याला आपण दरपत्रक म्हणतो- असू शकेल. परंतु हे नक्कीच तुमच्या व्यवसायाचं एक सगळं माहितीपत्रकच आहे. आणि प्रत्येक व्यावसायिकाची ही अपेक्षा असते की हे माहितीपत्रक लोकांनी पहावं आणि माझ्यापर्यंत माझ्या orders घेऊन यावं.

इतर व्यापारा प्रमाणेच आपण विचार करूया, की जरी आपण आपलं उत्पादन कितीही सुंदर बनवलं किंवा कितीही सुंदर आपण पुस्तक करून ठेवलं आणि स्वत:जवळच ठेवलं तर लोकं कसे येतील? आणि लोकं बघतील कसे? तर लोकांना त्याविषयी सांगायला हवंकी मी हे उत्पादन बनवलं आहे, किंवा मी माझ्या उत्पादनाची माहिती ह्या ह्या पुस्तकात ठेवलेली आहे. internet वर तर हे जास्त महत्वाच ठरतं. कारण बहुसंख्य लोकांचा तुमच्याशी होणारा संपर्क अदृश्य असतो. लोकं फक्त keywords टाकून त्यांची माहिती शोधत असतात. त्यामध्ये आपलं उत्पादन त्यांना सापडणं याच्याकरिता तुम्हाला तुमची माहिती संकलित करून व्यवस्थित ठेवावी तर लागतेच लागते; आणि ती माहिती वितरीतही छानप्रकारे करावी लागते. याला आपण Promotion असं म्हणू शकतो.

Promotion Material

तर हे website च्या व्यतिरिक्त काय promotion material असतं ते आपण थोडसं बघूया. अगदी याच्यामधलं लोकप्रिय promotion material म्हणजे PPT presentation. अर्थात “Power Point  Presentations” असतात. तर तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या विषयी, त्याच्या विविध पैलूंविषयी बोलणार. Power Point Presentation तुम्ही बनवू शकता. पैलू विविध असू शकतात. तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या विशिष्ठ भागाकरताच तुमच उत्पादन खूप चांगलं आहे तर तुम्ही ते पैलू मांडू शकता. किंवा त्यातलं एखादं वैशिष्ट्य चांगलं असेल तर त्याच्याबद्दल विस्तृतपणे माहिती मांडू शकता. परंतु तुमच्या व्यवसायाच्या विविध पैलूंविषयी तुम्ही power point presentations बनवायला हवीत.

दुसरं माध्यम त्याच्याच पुढचं – म्हणजे video. आता videos अनेक प्रकारचे असतात. तुम्ही जर यंत्रसामुग्री उत्पादित करत असाल, तर तुम्ही Machineries प्रत्यक्ष कशी चालते याचे तुम्ही प्रत्यक्ष shooting  करून videos बनवू शकता, किंवा यामध्येच तत्व सांगण्याकरिता concept videos – म्हणजेच animation स्वरुपात videos  बनवून घेऊ शकता. जाणून घ्या की internet किंवा online वर माणूस येतो तो माहिती घेण्याकरिता येतो. तो सरळ सरळ उत्पादन घेण्याकरिता खूप क्वचित येतो. माहिती घेणं हे त्यातलं प्रमुख तत्व आहे. आणि त्या माध्यमातूनच आपण जर पुढ आलो तर शक्यता आहे की आपल्याला अधिक काळ सतत online वरून व्यवसाय मिळत राहील.

तिसरं माध्यम म्हणजे E-catalogues. ज्याप्रमाणे आपण आपले catalogues बनवतो, तेच artwork तुम्ही internet वर बनवून घ्या. त्यातील एक युक्ती अशी आहे की internet वर बनविताना तुम्ही त्याचे असे version (प्रत) बनवा, कीजे website वर किंवा online पटकन उघडेल. तुमच्या commercial artist ला तुम्ही हे सांगून ठेवा; तो तुम्हाला अशी प्रत बनवून देईल. एकदा promotion material झालं आणि तुमची website सुद्धा झाली की मग ठरतं, की आता व्यवसायाला किंवा Marketing ला प्रत्यक्ष सुरुवात करायची.

Marketing ची सुरुवात

सुरुवात करताना आपल्याला हे ठरवायला लागेल की आपण कसं हे सगळं करणार आहोत. उदा. आपण प्रवासाला जाताना ठरवलंकी आपण दक्षिणेकडे प्रवासाला जायचं आहे, तर आपण आधी ठरवू की आपल्याला नक्की कुठली-कुठली ठिकाणे बघायची आहेत, आपण किती लोकं आहोत, आपण कसे जायचे आहे, आपण कुठल्या दिवशी जायचे आहे आणि कुठल्या दिवशी परत येणार आहोत, पुढे काय होणार किंवा पुढे काय हवं आहे… हे ठरवून आपण जी योजना आधीच करतो, त्याला strategy असं म्हटलं जातं. Strategy चा अर्थ व्यूव्ह रचना असा आहे. उदाहरणा दाखल आपण क्रिकेट या खेळातील उदाहरण घेऊ शकतो. एखादा फलंदाज, उदा. जयसूर्या नावाचा पूर्वी एक फलंदाज होता. जयसूर्या हा short-pitched बॉल वर हमखास बाद व्हायचा. तर त्या फटकेबाज फलंदाजाला बरोबर लवकर बाद करण्यासाठी सौरव गांगुली आणि श्रीनाथ. यांनी बरोबर एक व्यूव्हरचना केली होती. Short-pitched चेंडू ते टाकायचे. जयसूर्या त्याला हुक, किंवा पूल करायचा आणि सीमा रेषेवरचा क्षेत्ररक्षक बरोबर तो झेल पकडत असे. तर हे सगळं व्हायचं ते या व्यूव्हरचनेप्रमाणे. याच प्रकारे आपल्याला अश्या व्युव्हरचनेने बरोबर आपले गिऱ्हाईक पकडायचे आहे. ओके? हे का गरजेच आहे? यामुळे आपला focus व्यवस्थित राहतो, त्यामुळे आपण एकाच ध्येयावरती लक्ष केंद्रित करतो. आपले पैसे हे योग्य ठिकाणी खर्च होतात. आणि इतर आपले वायफळ कष्ट किंवा परीश्रम जे होतात त्यापासून आपण वाचू शकतो. त्यामुळे व्यूव्हरचना किंवा strategy हि अत्यंत आवश्यक आहे.

Strategy & Sales Funnel

प्रत्यक्ष strategy म्हणजे काय? ते कसं होईल? तर online marketing आपण करतो त्यातून येणारा visitor जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे हे आपण थोडसं समजून घेऊया.

प्रत्यक्ष व्यवसायात जेव्हा आपल्याकडे एखादा ग्राहक येतो, तर तो परत परत येण्यासाठी आपल्याला खूप जास्ती परिश्रम घ्यावे लागतात. आणि ही जाहीर गोष्ट आहे की, त्याच्याशी आपण जर सतत संपर्कात राहिलो तर तो कायमस्वरूपी आपला ग्राहक राहतो, आणि तो कायम स्वरूपी आपल्याला व्यवसाय देऊ शकतो. इथे online marketingमध्ये खूप मोठी संधी आहे आपल्या social media मधील काही channels किंवा Email marketing द्वारे आपण त्यांच्याशी संपर्कात राहू शकतो. तर हे करण्याकरिता आधी आपलं एक ‘sales funnel’ ज्याला म्हटलं जातं, हे करायला हवं.

Sales funnel ठरवतंकी तुमच्या ग्राहकाचे तुमच्या site वर behavior कसे असेल. अगदी funnel (म्हणजे नरसाळे) प्रमाणे अनेक लोकांमधून आपल्याला हवे असलेले लोकं कसे निवडून घ्यायचे आणि पुन्हा त्यांच्या संपर्कात राहायचं याची केलेली व्यूव्हरचना म्हणजे ‘sales funnel’.

तर आपल्याला या ३ गोष्टी जरूर ठरवायला लागतील. आपल्याकडे फक्त website असून महत्वाचे नाही तर आपल्याला इतरही माध्यमे लागतील आणि लोकांपर्यंत पोचायला इतरही गोष्टी लागतील. आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्यानंतर आणि लोकं आपल्याकडे आल्यानंतर त्यांना आपल्या उत्पादनांपर्यंत निरंतर कसं येत ठेवायचं याची एक व्यूव्ह रचना.

हा दुसरा लेख आपण इथे संपवतोय. तिसऱ्या लेखात आपण जाणून घेऊयात कि online marketing मध्ये प्रत्यक्ष विक्री मध्यम कोणती आहेत आणि त्याच्यावरून कसा व्यवसाय होईल. धन्यवाद.

Download Article

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews