शिक्षणवेध

Tabs वापरून ” ई-लर्निंग “..?

दप्तरांचे ओझे कमी करण्याविषयी सध्या बऱ्याच बातम्या ऐकावयास मिळतात, शासन मुलांच्यापाठी वरचे ओझे कमी करू इच्छिते, हेही नसे थोडके! पण ह्या संदर्भात “Tab” चा पर्याय हा एक गमतीदार प्रकार ऐकायला मिळतोय सध्या. अनेक शाळांनी उदा. पुण्यातले आझम कॅम्पस, किंवा मुंबईतील बालमोहन, तसेच दूर केरळमधील ही एका शाळेने मुलांना “Tab” वाटप केल्याच्या बातम्या कानावर आल्या. हे मुलांच्या खऱ्या शिक्षणात किती घातक आहे हे कळत असलं, तरी नक्की काय होतं ह्या प्रक्रियेत, ह्या विषयी वाचता वाचता नुकतीच, २५ डिसेंबरच्या टाईम्स ऑफ इंडिया मधील एक बातमी वाचण्यात आली.

“इ-खेळणी उदा. baby laptop, baby cell phones, talking farms मुलांची भाषिक कौशल्ये बोथट करतात.”

डॉक्टर Anna V. Sosa ह्या North Arizona विद्यापीठातील मुलांच्या भाषा प्रयोग शाळेच्या संचालिका आहेत. त्यानी केलेल्या एका पाहणीतील काही निष्कर्ष :-

१. ही खेळणी मुलाला पालकाबरोबरच्या देवाण-घेवाण प्रक्रियेपासून दूर नेतात, जी मुलाच्या मानसिक  विकासात (cognitive development )खूपच महत्त्वाची मानली जाते.

२. मुलं ह्या खेळण्यांसोबत खेळत असताना पालकाच्या प्रतिक्रिया तसेच मुलांचे संभाषण, दोन्हींत घट झाली. (पारंपारीक खेळण्यांपेक्षा)

३.पालक मुलांना अगदी बिनदिक्कत ह्या खेळण्यांसोबत खेळू देतात, जर मुलासोबत काही बोलायचे झालेच; तर फक्त “हे करू नकोस” “अमुक कर” अशा वर्तनाच्या अंगाने येणारी वाक्यच फक्त बोलतात. मुक्त संभाषण फारच कमी आढळलं.

४.साधारणत: कोणतीही पारंपारीक खेळणी (उदा. लाकडी ठोकळे) हाताळताना मुलानेत् याच्यासोबत धडपड करणं हा भाग बहुतांश असतो, ज्यातून त्याची मानसिक घडण होते. ह्या इ-खेळण्यांमध्ये ९०% ताबा ते खेळणंच घेतं, फक्त १०% मुलाचा सहभाग राहतो.

५. ह्या खेळण्यांबद्दल विचारलं गेलं तेंव्हा, पालकसाधारणत: ४० शब्द प्रती मिनीट, इतकंच बोलले, हेच प्रमाण पारंपारीक खेळण्याच्या बाबतीत ५७ (साधारण दीडपट) तर पुस्तकांबाबत ६७ (साधारण पावणेदोनपट) इतकं आढळलं.

ह्याच संदर्भात एरीका जोन्स, ज्या एक पालकआहेत; त्यांची मुलगी वयाच्या १० व्या महिन्यापासून ते आत्ता वयाच्या ३ ऱ्यावर्षापर्यंत ह्या प्रयोगात सहभागी आहेत, त्यांचं एक निरीक्षण वाखाणण्याजोगं आहे. त्या म्हणतात, की जेव्हां आजूबाजूला कुठलंही खेळणं नसेल, तेव्हां त्या त्यांच्या मुलीशी (ती १० महिन्याची असताना) आवर्जून काही तरी बोलायच्याच. पण जर का एखादं खेळणं असेल, किंवा कुठलं आवाज करणारं Electronic Gadget असेल, तर हे बोलणं व्हायचंच नाही.

“Tab” हेही एक इ-खेळणंच..!

Tab हेही एक इ-खेळणेच आहे, हे आपण विसरता कामा नये. माहिती त्यावरून पटाप्पट मिळेल, वगैरे भाग अगदी खर आहे. एखाद्या व्यवसायात ह्याचा उपयोग उत्तमहोतोच. पण शाळा, जिथे नुसती माहिती एका क्लिक वर हजर होण्यापेक्षाही ती मिळविण्यासाठीची धडपड, ती प्रक्रिया अधिक चांगले शिक्षण घडवते, तिथे हे एक निव्वळ खेळणेच ठरेल. त्या खेळण्यातून फक्त माहिती प्रोसेस होईल, खरं शिक्षण, जे “आतमध्ये” घडायला हवं, ते होणारंच नाही. फक्त “निकाल” मात्रछान लागतील.

फक्त निकालांवर लक्ष केंद्रीत करण्यातला धोका

ता.२६ डिसेंबरच्या पुणे “सकाळ” च्या मुख्य आवृती मध्ये डॉ संजय आवटे ह्यांनी हल्लीच्या नवीन, व्य्यावासायिक राजकीय नेत्यांविषयी खूपच उद्बोधक असं लिहिलंय. ते म्हणतात :

” हे नवे नेते अभ्यासू आहेत, उमदे वस्मार्टही आहेत;ते उत्तम कामही करतील; परंतु ते लोकांचे नेते नाहीत. कारणत्यांचा लोकांशी “कनेक्ट” धूसर होत चाललाय. त्यांच्यासाठी राजकारण ही एकनिव्वळ तांत्रिक आणी व्यवस्थापनातील एक बाब होत चालली आहे.”

हा सोशल कनेक्ट कमी होत जाणं ही बाब गंभीर आहे. आधीच इंटरनेटमुळे नात्यांमध्ये आलेलं तुटलेपण आपण पाहतोच आहोत; त्यात शाळेपासूनच ही अशी Gadgets वापरल्यामुळे मुलांचा, पालकांचा कनेक्ट नक्कीच कमी होत जाणार आहे. शिवाय एक व्यक्ती म्हणूनही मुलाचा त्यातून विकास होतो असं म्हणता नाही येणार. कारण एखाद्या विषयाची माहिती निमिषार्धात समोर हजर होणे, ती वापरून प्रश्नपत्रिका सोडवून, उत्तम मार्क्स मिळवून आयुष्याची इतीश्री मानणे ह्याचा अर्थ फक्त मूल “प्रशिक्षित” झाले, “सुशिक्षित” नव्हे.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews