व्यापारी मित्र

Online Marketing चे विविध मार्ग

[shareload image=”http://joywebservices.com/wp-content/uploads/2016/06/download.png” atext=””]

नमस्कार, Online Marketing द्वारे व्यवसायवृद्धी या लेखमालिकेतील तिसरा लेखांक आज आपण सुरु करतोय. गेल्या लेखात आपण पाहिलं की नुसती website असून भागणार नाही. तर तुम्हाला इतरही अनेक गोष्टी त्याच्यासोबत कराव्या लागतील. या लेखांकात आपण पाहणार आहोत, की साधारणपणे online साठी कुठली विक्री माध्यम उपलब्ध आहेत.

Online साठी उपलब्ध असलेली विक्री माध्यमं:-

Portals :

सर्वात पाहिलं मध्यम आपण बघुयात ते म्हणजे portals. Portals म्हणजे साधारणपणे असं एक आंतरजालावरचं (म्हणजेच internet) ठिकाण की तिथे एकाच जागी तुम्हाला व्यापारासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे एक प्रकारची online मंडईच म्हणा की! हे एक असं व्यापाराचं ठिकाण असतं की जिथे तुम्हाला लागणारी ग्राहके तुमच्याकडे येतात. तुम्ही तुमची उत्पादने किंवा तुमच्या सेवा तिथे विक्रीला ठेऊ शकता. तुमच्या अनेक प्रकारच्या सेवा सुविधा ते बघू शकतात, उत्पादने बघू शकतात; ज्याला listings असं प्रचलीतपणे म्हटलं जातं. तुम्हाला त्याच्यावरून ते संपर्क साधू शकतात. क्वचित प्रसंगी थेट त्याच्यावरून विकतही घेऊ शकतात. तर अशी internet वरची हि ठिकाणं म्हणजेच portals.

Vyaparimitra lekh 3.1याचं उदाहरण घ्यायचं झालं तर India-mart किंवा trade-India ही औद्योगिक उत्पादने किंवा ज्याला आपण ‘non-consumer goods’ म्हणू अश्यांसाठी अतिशय उत्तम अश्या या sites आहेत. या sites वर तुम्हाला तुमची उत्पादने listing करता येतात म्हणजेच यादी स्वरूपात तुम्हाला ठेवता येतात. लोकं ती पाहतात, लोकं तुम्हाला संपर्क करतात, तुम्हाला ती विकता येतात, वगैरे वगैरे. सेवांसाठी किंवा ज्याला आपण ‘local businesses’ असं म्हणतो, यासाठी सर्वोत्तम portal आहे ते म्हणजे ‘Just Dial’.

काही व्यवसायांना ही portals अतिशय उपयुक्त ठरतात. काही व्यवसायांना ती तितकीशी उपयुक्त ठरत नाहीत. परंतु ही portals तुम्हाला व्यवसायाची संधी नक्कीच देतात. मी असं अजिबात म्हणत नाही की portals म्हणजे सर्वोत्तम साधनं आहे. परंतु तुम्हाला internet वरच्या व्यवसायाची चुणूक पहायची असेल तर या portals वर तुमचे उत्पादन जरूर ठेऊन बघा. बहुतेक portals वरती तुम्हाला काही मोफत listings मिळतात. अर्थात त्याची features, म्हणजे त्याला मिळणाऱ्या सोई-सुविधा या premium (म्हणजे पैसे भरून करत असलेल्या) listing पेक्षा नक्कीच कमी असतात. परंतु portals वरून एकंदरीत व्यवसाय कसा चालतो किंवा internet वरून कसा चालतो हे कळण्याकरिता portals वरून तुम्ही तुमची उत्पादने ठेवलीत तर तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळू शकते.

तुमचा व्यवसाय किंवा औद्योगिक उत्पादन किंवा machinery किंवा परत ‘non-consumer goods’ तुम्हाला जर जगभर विकायची असतील तर ‘Alibaba’ नावाची एक अतिशय लोकप्रिय site आहे. त्याच्यावर इतर साधनांसोबत त्यांचे chatting चे एक माध्यम आहे, ज्याला trade manager असं म्हणतात. तर या trade manager च्या ‘chatting room’ मध्ये अनेक लोकं आपापली दुकानं उघडून बसलेली असतात, अर्थात online. तुम्हाला ती पाहता येतात, त्यांच्याशी चर्चा करता येते, अर्थात chatting द्वारे आणि तुम्हाला पुढचा व्यवहार ही करता येतो. तर हे झालं दुसऱ्याच्या दुकानात आपला माल ठेऊन विकणे.Vyaparimitra lekh 3.2

Advertising :

याशिवाय internet वरच तुम्हाला जाहिरात देऊन-सुद्धा तुम्हाला तुमची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोचविता येतात. त्याच्यात google चा ‘Adword’ हा platform किंवा सेवा तसच facebook आणि Linked-In यांचीसुद्धा सेवा उपलब्ध आहे. शिवाय quikr, olx या sites सुद्धा आहेत ज्यावरून जाहिराती देऊन तुम्हाला लोकांपर्यंत पोचता येईल. हे झालं सगळ पैसे देऊन तुम्हाला काय काय करता येईल याबद्दल.

SEO :

SEO1याशिवाय तिसरी एक लोकप्रिय सेवा म्हणजे SEO, अर्थात Search Engine Optimization. हे Search Engine Optimization’ म्हणजे काय तर एखादा शब्द google वर टाकता तेव्हा google जे शोध दाखविते त्या सगळ्या शोधांमध्ये तुमच्या कंपनीचे नाव अग्रेसर यावे याकरिता केले जाणारी कृती किंवा विशेष प्रयत्न.

तर हे SEO म्हणजे विविध keywords शोधले जातात, त्यांचा अभ्यास होतो, आणि अतिशय कौशल्यपुर्वक तुमच्या website वर विविध प्रकारे आणि तुमच्या marketing मध्ये विविध प्रकारे हे keywords वापरून तुम्हाला तुमची site पहिल्या पानावर आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न.images for vyaparimitra lekh6.3

Social Media Marketing :

याशिवाय social media हा एक marketing चा नवा प्रकार हल्ली सुरु झालाय. अर्थात facebook, twitter, Linked-In अश्या ज्या social networking च्या sites आहेत यावर शिस्तबद्ध marketing करणे. Email, SMS marketing हेदेखील खूप प्रचलित आहे.

 

Email marketing :

aweber-vs-mailchimpEmail marketing मध्ये २-३ प्रकार केले जातात. २ प्रकार खास करून सुपरिचित आहेत. ते म्हणजे – तुमच्याकडे एकाच वेळेस अनेक Email addresses दिले जातात आणि एकाच वेळी या सर्वाना email पाठविण्यात येतो. हे आहे प्रचलित Email marketing. पण हे तितकेसे प्रभावी नाही बर का! कारण या emails सगळ्यांना पोचतच नाहीत मुळात. त्यामुळे email चे दुसरे जे रूप आहे ज्याला newsletter marketing म्हणतात, अर्थात बातमीपत्र, हे खूप चांगल्या प्रकारचे marketing आहे. याकरिता काही sites वरून तुम्हाला newsletters तयार करता येतात.

त्यातली mailchimp (मेल-चिम्प) ही site खूप प्रसिद्ध आहे. मोफत आहे, सुरुवात करायला काहीच हरकत नाही. अर्थात aweber ही सुद्धा खूप सुंदर अशी site आहे. याला पैसे पडतात पण माझ्या मते आताची सर्वोत्तम site आहे.

SMS marketing :

SMS marketing बद्दल मी फार सांगायची गरज नाही. Bulk SMS हा प्रकार खूप प्रचलित आहे. पण याचंही तसंच आहे. हल्ली बरेचसे numbers DND (Do Not Disturb) या प्रकारात मोडतात. त्यामुळे त्या क्रमांकापर्यंत तुमचे SMS अर्थात फोनचे निरोप पोचत नाहीत.

Video Marketing :

Video-marketing-on-YouTube-LHOWVideo marketing हा एक प्रकार प्रचलित आहे. खूप चांगला आणि खूप उपयुक्त प्रकार आहे, खास करून यंत्रसामुग्री बनविणाऱ्या लोकांना अतिशय उपयुक्त असा video marketing चा प्रकार आहे.

तुमच्या उत्पादनांचे, सेवांचे videos तुम्ही बनवून घ्या आणि youtube वर तुम्हाला ते videos ठेवता येतात. म्हणजेच upload करता येतात. आणि हे videos अनेक लोकं अनेक प्रकारे पाहत असतात. त्यातून तुम्हाला व्यवसाय मिळू शकतो.

 

Blogging :

Multi Ethnic People Holding The Word Bloggingयातला शेवटचा प्रकार पाहतोय- आणि तो म्हणजे blogging. Blogging म्हणजे- blog; या शब्दाची जर फोड केली तर ते खरं म्हणजे ‘web log’ असं निघतं. अर्थात तुमच्या website वर किंवा तुमच्या internet वरच्या ठिकाणांवर आल्या-गेलेल्या ची नोंद ठेवणारी वही. असं जरी म्हटलं तरी हे blogs खूप सुंदर करता येतात. आणि blogs हे अतिशय प्रभावी मार्ग किंवा माध्यम आहे. कारण blogging मध्ये प्रामुख्याने लोकं त्यांना पडणारे विविध प्रश्न, चर्चा इ. करण्याकरिता येतात. आणि अतिशय उपयुक्त माहिती सगळी आपाल्याला विविध प्रकारच्या blogs वर मिळते.

तर हे सगळी online ची विविध विक्री मध्यमं आपण पाहिली. परंतु, यातून तुम्हाला जर result – म्हणजे त्यातून चांगल्या प्रकारे फळ – मिळवायचे असेल तर त्याच्याकरिता तुमची जी आपण व्युव्हरचना म्हटली किंवा strategy म्हणतो आहे ही अत्यंत महत्वाची आहे. तर लेखांक २ मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रथम तुमची- छोटी का होईना- एक website बनवा. त्याला एक व्यवस्थित, नीटनेटकी आणि सुटसुटीत अशी एक व्यूव्हरचना तयार करा की जेणेकरून तुमच्याकडे तुमचा ग्राहक निरंतर येत राहील आणि मगच या online विक्री माध्यमांच्या मार्फत तुम्ही सुरुवात करा.

धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews