E-Learning Tips

नमस्कार, E-Learning Tips मध्ये स्वागत !

यातलं पुढंच तंत्र आपण पाहूया, ते म्हणजे – तुम्ही केलेला सगळा research किंवा शोध किंवा विविध कागदपत्रे तुम्हाला internet वरच कशी save करता येतील. म्हणजेच, तुम्ही आत्तापर्यंत bookmarking द्वारे किंवा folder logic द्वारे तुमच्या computer वर विविध folders वर तुमचं काम जे आहे ते वाचवून ठेवताय. आता internet वरच कसं वाचवता येईल आणि का वाचवायचं हे आपण बघूया.

जशी तुमच्या computer वर एक निश्चित केलेली जागा आहे जिथे सर्व काम save होते, (म्हणजे hard-disk  वर, बरोबर?) त्याप्रमाणे अशीच जागा तुम्हाला internet वरती सुद्धा उपलब्ध मिळते, जिथे तुम्ही तुमचे काम save करून ठेऊ शकता. अशाप्रकारे जागा देणाऱ्या अनेक sites आहेत. त्यातल्या प्रमुख २ site आपण बघूया.

Google Drive:-

E-Learning टिप्स

Google Drive हि एक site आहे. Google Drive मिळण्याकरता तुम्हाला फक्त gmail चं account लागतं. तुम्ही Google drive  घेतलात की तुम्हाला साधारणपणे एका account बरोबर 25GB इतकी जागा तुम्हाला तुमची कागदपत्र साठवायला मिळू शकते. Google drive चा फायदा असा कि एकतर ते विनामूल्य आहे. आणि तुमच्या संगणकाला म्हणजे computer system ला यदा कदाचित काही problem झाला तर तिकडे तुमची महत्वाची documents साठवली असतील तर ते खूप secure, व्यवस्थित व सुरक्षित राहतात. त्याचा दुसरा फायदा असा कि तुम्हाला तुमची कागदपत्र कुठूनही उघडता येतात. म्हणजे एखाद्या वेळेस तुमचा संगणक किंवा laptop तुमच्या बरोबर नसेल तरीही तुम्हाला तुमची कागदपत्र तिथून उघडता येतात, इंटरनेट वरून. समजा तुम्ही android फोन वापरताय, mobile phone वापरताय, mobile वर सुद्धा Google Driveचं app आहे, ज्यात तुमची सगळी कागदपत्र मिळू शकतील. जर तुमचा computer तुमच्या बरोबर नसला तरीही. अशाप्रकारे internet वर तुम्हाला ही जागा उपलब्ध होते.

Dropbox :-

दुसरी एक site अशी आहे त्याला म्हणतात “Dropbox.” Dropbox हि Google drive सारखीच utility म्हणता येईल. समजा तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे काम तुमच्या laptopवर शिवाय तुमच्या ऑफिसमधल्या संगणकावर सुद्धा करत असाल तर dropbox हे अतिशय सोयीचे application आहे. याद्वारे तुम्ही यापैकी कोणत्याही एका संगणकावर त्या प्रकल्पांतर्गत save केलेल्या files या दुसऱ्या संगणाकावर आपोआप save होतील.

Dropbox कसे वापराल?

img1

 • Googleवर Dropbox असे search करा.
 • तुम्ही Dropbox free download करू शकता.
 • ते desktop वर save करा.
 • Laptop वरील हवी असलेली file Dropbox मध्ये drag करून upload करा.

 

img2

 • Googleवर Dropbox असे search करा.
 • तुम्ही Dropbox free download करू शकता.
 • ते desktop वर save करा.
 • Laptop वरून जी file upload केली होती ती desktop वर आपोआप मिळेल.

img3

Dropbox चे फायदे

 • तुम्ही बाहेरगावी जरी गेलात तरी तुम्ही कुठल्याही संगणकावर internet मुळे dropbox वरून ती file access करू शकता.
 • तुम्हाला दरवेळी pen drive किंवा hard disk ची गरज नाही.
 • याचे android आणि iphone app सुद्धा उपलब्ध आहे.

धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *