हे खरखुरं इ-लर्निंग !

इ-लर्निंग, डिजिटल इंडिया वगैरे शब्द मोदी सरकारच्या राज्यात जरा जास्तच ऐकायला मिळत आहेत. अर्थात सध्या युगही तसंच आहे म्हणा. विविध योजनांद्वारे, सध्या सरकार तमाम जनतेला इ-साक्षर बनवू पाहत आहे.

जगही बदलतंच आहे म्हणा. म्हणजे कामाच्या पद्धती बदलताहेत. शिकायच्या देखील; काय तर म्हणे दप्तराचं ओझं कमी करण्याकरिता Tabs वापरणे. दादरच्या बालमोहन मध्ये देण्यात येणार होते, पुण्याच्या आझम campus मध्ये देखील असा प्रस्ताव होता, केरळातही एका दुर्गम भागातल्या शाळेत हा उद्योग करण्यात आलाय, आलेही असतील एव्हाना. प्रश्न काय तर मुलांचं दप्तर हलकं करायचंय. तर ह्या मंडळींनी tab हे उत्तरकाढलं. कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. tab च्या  विरोधात मी नाही. पणप्रत्येक विद्यार्थ्याला tab देण्याबद्दल आक्षेप जरूर आहे. tab वरून इंटरनेट वरचे videos वगैरे पाहून शिक्षण होतं, हे खरंच आहे. पण सरसकट सगळ्यांना देण्याची अजिबात आवश्यकता नाहीये.

सोलापूर जिल्ह्यातला प्रयोग

ह्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या परितेवाडी या छोट्याशा गावातला एक प्रयोग मला नमूद करावासा वाटतो. रणजित दिसले नामक एका प्राथमिक शिक्षकाने खरखुरं इ-लर्निंग कसं चतुराईनी वापरलंय ते अगदी पाहण्याजोगं आहे.

त्यांनी बालभारती मधील कवितांना चाली लावल्या, माफक संगीतावरत्या तालबद्ध बसवल्या. चक्क गेय केल्या. नंतर सदर गाणी त्यांनी Youtube वर अपलोड केली. youtube ही जगातील अग्रगण्य video sharing वेबसाईट आहे, हे आपल्याला ठाऊक असेलच. त्यावर आपल्याला देखील आपले videos विनामूल्य अपलोड करता येतात. तर अशा प्रकारे त्या कविता गेय करून अपलोड केल्या गेल्या.प्रत्येक कवितेला एक वेगळी लिंक मिळाली. म्हणजेच प्रत्येक धडा, किंवा कविता, त्याचा अर्थ जाणून घेऊन, गेयता असल्याने रंजकतेने शिकता येऊ लागली; हा झाला एक साधारण उपयोग. अर्थात प्रत्येक कवितेचा video पाहण्यासाठी त्याची लिंक, जी थोडी विचित्र स्वरूपात असते, ती प्रत्येकवेळी smart फोन वर टाकणं आलं. म्हणजे पुन्हा तंत्रापासून दूर जाण्याची शक्यता आली.

QR कोडद्वारे ह्या समस्येवर मात..!

मुळात QR कोड म्हणजे काय हे जाणून घेऊयात. सदर आकृती मधले बिंदू चित्र तुम्ही अनेक ठिकाणी बघितले असेल. हाच तो QR कोड. याचा फायदा असा की, त्याच्यासमोर तुमचा smart फोन नेलात, की तो लगेच scan होतो व तुम्हाला हवी ती वेबसाईट किंवा लिंक क्लिक होते आणि तुम्हाला त्या लिंकमधील किचकट, लांबलचक अक्षरं Type करायला न लागता तुम्ही त्या साईटवर थेट पोचता.

बरोब्बर..! हेच रणजितने केलं. प्रत्येक धडा-कवितेला त्यांनी एक कोड चिकटवला, म्हणजे त्यावर तुमचा android मोबाईल धरला, की त्या त्या धडा-कवितेवर लगेच जाता येतं. वाचायला सोप्पं वाटतंय हे, पण सुचणं खूप अवघड आहे. रणजीतचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.

आता रणजीत हा मोबाईल फोन (एकच) वर्गात ठेवतात, त्यावर मुलांकडून नाच-गाण्यातून अत्यंत प्रभावी पद्धतीने अभ्यासही करून घेतात.

हे खरं-खुरं ई-लर्निंग !

नुकतंच thyrocare ह्या कंपनीचे सर्वे-सर्वा डॉ. वेलूमणी ह्यांनी एका भाषणात म्हटलं होतं कि, तुम्हाला खरा कल्पना विकास किंवा innovation साधायचं असेल, तर जेमतेम १००० वस्तीच्या खेड्यात जाऊन रहा. रणजीत दिसलेंचा अभिनव प्रयोग पाहून अगदी पटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *