उद्योजक

व्यवसाय वृद्धीसाठी कालसंगत धोरण हवे

Download Article

यंत्र अर्थात मशिनरी उद्योग हा एक भांडवली गुंतवणुकीचा उद्योग म्हणता येईल. म्हणजेच ह्यासाठी थोडे जास्त पैसे पडतात. त्यामुळेच मशिनरी मारकेटिंग करताना आपल्याला इतर वस्तू अथवा उत्पादनांपेक्षा सर्वस्वी वेगळे पैलू ध्यानात घ्यावे लागतील. अर्थातइ मारकेटिंग करीत असतानाही.

इ-मारकेटिंग चे वेगळेपण

आता, जरी वेब मारकेटिंग, किंवा इ-मारकेटिंग आपल्याला बऱ्यापैकी रुळलेले दिसत असले तरी ते पारंपारिक पद्धतीच्या मारकेटिंगपेक्षा जरा वेगळे आहे. हो, पण दोन्हींचा उद्देश मुळात योग्य ग्राहकापर्यंत पोहोचणे हाच आहे. मुळात इ-मारकेटिंग चं वेगळपण ह्याच्यात आहे, की ह्यात ग्राहक शोधणे, त्याला संपर्क करणे इ. सर्व गोष्टी पडद्यामागे घडत असतात, आणि ग्राहकही तुमच्या विषयी प्रतिक्रिया व्यक्त न करता, अंदाज बांधत असतो. त्यामुळे “एका क्लिक” मध्ये आपण ग्राहकापर्यंत पोचतो असा ह्यातून जरी भास होत असला, तरीही अशाच कृती आपले स्पर्धकही करीत असतात. शिवाय ग्राहकांनाही एव्हाना ह्या माहिती-भडीमाराची (Information-Overload) ची सवय झालेलीच आहे, त्यामुळे योग्य (Right) आणि समर्पक (Relevant) अशा संभाव्य ग्राहकांपर्यंत (Prospects)पोहोचणं आणि त्यांत स्वत:चं वेगळेपण सिद्ध करून त्याला प्रस्थापित ग्राहकामध्ये रुपांतरीत करणं (Customer) हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक झालाय !

खालील पद्धतीने पायरी-पायरीने (Step by Step) कृती करत गेल्यास निश्चित, सुरळीत व दीर्घकालीन यश निरंतर मिळत राहील :

स्वत:ची निश (niche) जाणून घ्या.

निश (Niche) हा शब्द तुमच्या वारंवार वाचनात येईल ह्यापुढे. मला स्वत:ला समांतर शब्द सापडलेला नाहीये ह्याला, पण मी निश म्हणजे काय हे सांगायचा थोडासा प्रयत्न करून पाहतो. आपापल्या व्यवसायाचा एक एक गट असतो, उदा औषधे, किंवा प्रोटीन फूड, आहार सल्लागार इ. तर हे सगळं आरोग्यविषयक आहे, तर त्याला हेल्थ निश असं म्हटलं जाईल. तर तुमचा यंत्र उद्योग आधी कोणत्या निश मध्ये आहे हे ठरवून घ्या. जर का तुम्ही जल-शुद्धीकरणाची मशीन्स बनवत असाल , तर ती एक हेल्थ निशच झाली. अन्न-प्रक्रिया मशिनरी बनवत असाल, तर ती “फूड” निश झाली.जर तुम्ही विटा बनवायची मशिनरी बनवत असाल, तर ती Construction निश झाली. ह्याला अशी व्याख्या काही नाहीये, पणसमजून घ्या म्हणजे इ मारकेटिंग ला सोप्पं जाईल.

तुमची विविध यंत्रे-त्यांची बाजारपेठ ह्यांची एक यादी तयार करा.

एकाच यंत्राचे अनेक उपयोग असू शकतात. उदा. बाटल्या भरण्याचे यंत्र – औषध कंपन्यांनाही लागेल, त्याच वेळी ज्यूस कंपन्यांनाही लागेल. एकाच यंत्राला दोन मार्केट्स उपलब्ध आहेत. अशा प्रकारे तुमची सर्व यंत्रे, तसेच त्यांच्या संभाव्य बाजारपेठा ह्याचा एक तक्ता तयार करा. एकापेक्षा जास्त बाजारपेठा असतील, तरतितके रकाने वाढवा.

सर्वोत्कृष्टअशी त्यातली एक (एकच) बाजारपेठ निवडा.

सुरुवात एका बाजारपेठेपासून करूयात. एकदा का तुमच्या अंगवळणी पडलं, की तुम्ही ह्याच सर्व गोष्टी लीलया करू लागाल, तेव्हा दुसरी.

आता तुमची इ-मारकेटिंग साधनं तयार करा

काय काय असतील ही साधनं? ही निवडताना, तयार करताना, तुमच्या यंत्र उद्योगाची महिती पोचवण्याची सर्व माध्यमे कल्पून पहा किंवा एखादी विचारणा झाल्यास, तुम्हाला इमेल द्वारे काही माहिती पाठवायची झाल्यास काय साहित्य तुमच्याकडे असायला हवं ह्याची एक यादी करून एक एक करत ती तयार करा.साधनं खालीलप्रमाणे असतील :

इमेल द्वारे पाठवायचे पत्र (जोडलेला मजकूर वाचायला तो इमेल उघडायला तर हवा ना!)

माहितीपत्रक: brochure तयार करताना व्यावसायिक फोटोग्राफरची व डिझायनर चीच मदत घ्या.

व्हिडिओ: यंत्राचे प्रत्यक्ष वापराचे चित्रीकरण असेल तर उत्तमच नसेल तर, फक्त फोटो वापरूनही व्हिडिओ तयार करता येतील. (animoto.com वापरून पहा), नंतर यु ट्यूब वर उपलोड करा.

स्लाईड शो: PPT वापरून हे तयार करा, सदरस्लाईड शो, नंतर स्लाईड-शेअर ह्या साईट वर विनामुल्य अपलोड करा. जगासमोर येईल. (slideshare.com)

वेबसाईट, सोशल मिडिया: नुसती वेब साईट किंवा फेस बुक पेज तयार करून उपयोग नाही, तर त्यावर योग्य असा मजकूरही हवा. वेब साईट करताना डोमेन नेम उदा. Joywebservices.com हे महत्त्वाचे असते. ते स्वत: विकत घ्या. त्याचे हक्क स्वत:कडेच ठेवा. ते देवून एखादा स्थानिक वेब डिझायनर तुम्हाला एक वेब साईट बनवून देईल.

सोशल मिडिया मध्ये whatsapp, फेसबुक, लिंक्ड इन, ट्विटर इ. येतात. तुमच्या ‘निश’ प्रमाणे कुठलं माध्यम ते ठरवा. एकदम सगळीच एका वेळी नको. त्यांवर कंटेंट सतत टाकत रहा, अतिशयोक्ती नकोच. आठवड्याला साधारण २ पोस्ट पुरेशा असतात. सतत स्वत: बद्दलच लिहायला पाहिजे असं अजिबात नाही. फक्त विषयाला धरून लिहा. नियमित पोस्टिंग करीत रहा, हे महत्त्वाचे.

तुमचा सेल्स फनेल तयार करा.

फनेल म्हणजे चक्क नरसाळे. नरसाळे काय करते, तर विखुरलेले स्त्रोत एका स्थिर धारेत रूपांतरण करते जेणेकरून आपल्याला एका ठराविक बाटलीत तो द्रव भरता येतो. त्याच प्रमाणे आपला सेल्स फनेल आपल्या विविध विचारणा (enquiries / leads) एका ठराविक पद्धतीत आणेल व तुम्हाला त्याच्यावर काय पुढची कृती करायची हे ठरवता येईल. एकदाच आलेल्या ग्राहकाला कायमस्वरूपी ग्राहक बनविताना हे फनेल तुमच्या उपयोगी पडेल.

लीड जनरेशन

प्रत्यक्ष विचारणा होण्यासाठी तुम्हाला लीड जनरेशनचा एक किंवा अनेक मार्ग निवडावे लागतील.

बि २ बि पोर्टल वर जाहिरात: उदा. इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया, इ. ह्यावर जाहिरात केली आणि झाले, असे मात्र होणार नाही. कारण इथेही स्पर्धा ही आहेच. पण पोर्टल + तुमचा follow up ह्या मार्गाने आलेली संधी रुपांतरीत करायला कमी वेळ लागेल. सुरुवात करायला उत्तम मार्ग आहे हा. सूत्र पुन्हा तेच. एकाच पोर्टल निवडा.

गुगल ads: थोडासा महागडा मार्ग आहे हा. पण जास्त वेचक लीड्स तुम्हाला मिळू शकतील.

SEO: हा देखील एक उत्तम परंतु लांबवर चालू ठेवायला लागणारा मार्ग आहे. ह्याद्वारे, तुमच्या यंत्र सामुग्रीचा गुगल वर शोध घेताना कोणते शब्द किंवा शब्द प्रयोग केले जातात ह्याचा अभ्यास केला जातो, व तुमच्या व्यवसायाला त्या शोध मोहिमेत प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न केला जातो.

फॉलो अप करणे:

ह्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुगल कॅलेंडर, टास्क्स वगैरे खूपच उपयुक्त अशी साधने ह्याकरिता उपलब्ध आहेत, तुमचा स्मार्ट फोन वापरुनही तुम्हाला हे काम सहज करता येते. पण वेळेवर हे फॉलो अप करणे, करीत राहणे, ह्याला मात्र पर्याय नाही.

टीप:

  • सर्व साधने आधी तयार करून मगच जाहिरात करा.
  • तुमच्या चांगल्या ग्राहकांचे “review” खूप महत्त्वाचे आहेत. ते गोळा करून साईट वर, सोशल मिडिया वर शेअर करत रहा. अत्यंत उपयुक्त ठरेल.

Download Article

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews