व्यापारी मित्र

वेबसाईट वरून ग्राहक तुम्हाला संपर्क साधू शकतोय का ?

तुमचे  contact us हे पान सर्वात महत्त्वाचे !

मे-२०१६ च्या अंकात आपण पाहिले, की तुम्हाला online विक्री सुरु करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या कंपनीची (किंवा जर तुम्ही स्वत: एक व्यावसायिक असाल, जसे की सल्लागार, ट्रेनर वगैरे तर तुमची) एक वेब साईट करून घ्यावी लागेल. सदर लेखात आपण पाहिले, की त्यामार्फत तुमची online विक्री कशी सुरु करता येईल वगैरे. परंतु, हे सगळं एखाद्याने बघितलं, व त्याला तुम्हाला संपर्क करावयाची इच्छा झाली, तर तुमचा हुकुमी एक्का म्हणजे : तुमचे “Contact Us” किंवा संपर्क पान.

Contact Us चे पान तयार करताना लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी

पानाची रूपरेषा अर्थात डिझाईन

खूपच महत्त्वाचं आहे हे. सुंदर, छान, वगैरेही पेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे, तुमचे सर्व संपर्क पत्ते किंवा ठिकाणं एका झटक्यात ग्राहकाला दिसत आहेत कि नाहीत हे. एक तर ग्राहक हे पान त्यांच्या संगणकावरून – नाही – बहुतेक करून त्यांच्या मोबाईल वरूनच उघडेल. तेव्हा तुम्हाला संपर्क साधायचे पर्याय झटक्यात “ओपन” व्हायला हवेत. खरं म्हणजे एकंदरीत पूर्ण वेब साईट तयार करतानाच हा विचार करायला हवा. ह्याला responsive डिझाईन असे म्हणतात.

पूर्ण पत्ता लिहा

बऱ्याचदा, एक  “contact form” टाकला जातो. त्याचा उद्देश असा असतो, की ग्राहक तो भरतील, व तुम्हाला संपर्क साधतील. उद्देश चुकीचा नाही, पण  बऱ्याचदा, लोक हे भरायचा कंटाळा करतात. ऐवजी स्वच्छ पत्ता टाकलात, तर बिघडले कुठे? सोयच होईल. शिवाय तुमच्या व्यवसायाची सत्यता अधिक बळकट होते. तुमच्या जर अनेक शाखा असतील, तर तेही जरूर नमूद करा. हल्ली खूपच लोक गुगल map टाकतात. उत्तम मार्ग आहे. परंतु तत्पूर्वी तुमच्या व्यवसायाची नोंदणी “गुगल माय बिझनेस” वर व्यवस्थित करून घेणे आवश्यक.

contact form जर टाकतच असाल, तर…..

contact फॉर्म ही एक उत्तम सोय आहे, वादच नाही. सदर फॉर्म भरून ग्राहक तुम्हाला संपर्क करतात. हा संपर्क निरोप तुमच्या इमेल मध्ये येत असतो. तो तपासायची एक सवय ठेवा. कधी कधी तो “spam” फोल्डर मध्येही जावू शकतो. तेही तपासा. सदर विचारणेला लगेच उत्तर द्या. तुमच्या वेब डिझायनरला सांगून एक “Auto Responder” सुद्धा तयार करता येईल. त्याचं प्रयोजन हे की, सदर व्यक्तीने संपर्क केल्या केल्या त्यांना एक आपोआप निरोप जावा, की-

      धन्यवाद. आपला निरोप आम्हाला मिळाला आहे. संबंधित व्यक्तींकडे सदर निरोप देण्यात येईल व दखल घेतली जाईल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी अशी विनंती !”

हा निरोप अधिक कल्पकतेने तयार करून ग्राहक आकर्षित करता येते. ह्यालाच म्हणतात 24 x 7 मार्केटिंग !

उत्तम उदाहरण : http://mineralwaterprojectinformation.org/contact-us

फोन नंबर टाकावा की नाही?

व्यवसायाप्रमाणे ठरेल ते. परंतु जे अगदी थेट ग्राहकाभिमुख व्यवसाय आहेत (B2C) जसे की साडी दुकान, डाएट क्लिनिक, जिम, हॉटेल, जेथे मनुष्य प्रामुख्याने दूरध्वनी द्वारे संपर्क साधतो, तेथे फोन नंबर टाकणे अत्यावश्यक आहेच; शिवाय शाखावार वेगवेगळे नंबर्स द्यायला हवेत. तरच अपेक्षित परिणाम साधला जाईल.

“पानाची रूपरेषा अर्थात डिझाईनह्या परिच्छेदात म्हटल्यानुसार तुमची साईट मोबाईल responsive असणं अत्यंत आवश्यक आहे. नसेल, तर संपर्क साधणे महा कर्मकठीण होवून बसते. परिणामी तुमच्या कडे येणारे गिऱ्हाईक ज्यावरून थेट फोन करता येईल, अशा कडे सहज जाईल. हळू हळू तुमचा मार्केट शेअर कमी कमी होत जाईल !

खरं म्हणजे online marketing च्या सुरुवातीच्या काळात सर्वच व्यवसायांनी फोन नंबर्स द्यावेत, परंतु तरीही, काहींची इच्छा नसल्यास, त्यांनी त्यांचे contact फॉर्म मात्र व्यवस्थित तयार करून त्यावरून येणारी उत्तरेही व्यवस्थित पाहत राहण्याची गरज असते.

 

 

 

 

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews