व्यापारी मित्र

विक्री सुरु करायचीय? सज्ज व्हा, सशस्त्र व्हा!

Online मार्केटिंग: नव्या व्यापार युगाचा मूलमंत्र

“महापालिकेच्या शाळा डिजिटल होणार”, “राष्ट्रीय कृषी बाजार द्वारे सर्व समित्या इंटरनेटने जोडल्या जाणार”, “स्वयंचलित हवामान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना अचूक अंदाज प्राप्त होणार”, “इ-commerce व्यवसायात १००% परकी गुंतवणूक शक्य”.

ह्या आणि अशा तत्सम बातम्या सूचित करतात, की पुढील, म्हणजेच भविष्यातला ट्रेंड काय असणार आहे – खरं म्हणजे आत्ताच तो बदललेला दिसून येवू लागलाय.ज्या ‘ग्राहक-राजा’ साठी तुम्ही सगळा व्यवसायाचा खटाटोप करताय, तो आता कशी खरेदी करणार आहे, किंवा करतोय ह्याची ह्यावरून झटक्यात कल्पना येते. अर्थात online! तर तुम्हीही ह्याकरिता सज्ज होणे ही अगदी आवश्यक बाब होवून बसलीये.

कोठून सुरुवात कराल?

वेब साईट

एक वेब साईट तयार करून घ्या ज्यावर तुमच्या सर्व उत्पादनांची/सेवांची माहिती असेल. तुमच्या बजेट प्रमाणे ठरवा की त्यावरून थेट पेमेंट करून माल खरेदी करता यायची सुविधा ठेवायची आहे किंवा नाही ते. थेट माल विक्री नसेल, तरसुरुवात अगदी जुजबी वेब साईट ने करता येईल. परंतु त्यावर आवश्यक पाने हवीतच.

  • ‘about us’ अर्थात तुमच्या विषयीचे पान
  • ‘Product / Services’ तुमच्या सेवा/ उत्पादनांची माहिती
  • ‘contact us’ अर्थात संपर्काचे पान
  • ‘reviews’ अथवा ‘testimonials’ म्हणजेच समाधानी ग्राहकांच्या प्रतिक्रियांचे पान
  • ‘photo gallery’ किंवा ‘न्यूज’ चे पान

उत्तम ग्राफिक्स व फोटोज

online मार्केटिंग हे तुमच्या अपरोक्ष होत असते. ह्याचाच अर्थ तुमच्याबद्दल मत बनविताना online ग्राहक हा तुमच्या online असणाऱ्या विविध साहित्यावरून नजर टाकतो. त्याचवेळी तो इतर वेब साईटसुद्धा पाहत असतोच. त्यामुळे तुमचे फोटो, लोगो वगैरे चांगल्या दर्जाचे असायला हवेत. अर्थात ते व्यावसायिक मंडळींकडून करून घ्या. हीच बाब फोटोज बाबत. आपले आपण फोटो काढणं आणि एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफर ने ते काढून प्रोसेस करून दिल्याने खूपच फरक पडतो.

कॉर्पोरेट प्रोफाईल तसेच प्रेझेन्टेशन

कॉर्पोरेट प्रोफाईल म्हणजे तुमचा व्यावसायिक लेखाजोखा. ह्यात तुमचा व्यावसायिक अनुभव , तुमचे नामचीन ग्राहक , तुमचेसध्या चालू असलेले प्रकल्प तसेचभविष्यातल्या योजनांची रीतसर मांडणी करता येईल. जेणेकरून तुमचा तुमच्या क्षेत्रातला अधिकार समोरच्या व्यक्तीला दिसेल. हे प्रोफाईल पीपीटी स्वरूपातही करून ठेवा.

 

टीप: ह्या प्रेझेन्टेशन चा एक छोटासा व्हिडिओ (प्रत्यक्ष शुटींग नसलेला) बनवून घेतल्यास प्रचंड फायदा होतो.

 

प्रमुख सोशल नेटवर्क्स वर नियमित पोस्टिंग करीत राहणे

whatsapp, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, यु ट्यूब इ. प्रमुख सोशल साईट वर देखील खाती उघडा व पोस्टिंग सुरु करा. अतिशयोक्ती नका करू. सुरुवातीला आठवड्यातून १-२ वेळा किंवा गरजे प्रमाणे, परंतु विषयानुरुपच (relevant) पोस्ट्स ठेवा.एक सवय लावून घ्या. एकदा अंगवळणी पडलं की हे सहज होऊ लागेल.

टीप: सहज होतंय,किंवा मोबाईल वरून होत असलं तरीही अति पोस्टिंग चा मोह टाळा.

 

इ-मेल स्वाक्षरीत तुमच्या वेब-साईट ची माहिती द्या.

प्रत्येक वेळी तुमच्या व्यवसायाची आपसूक माहिती देत राहणारे माध्यम म्हणजे तुमची इमेल स्वाक्षरी. ह्या स्वाक्षरीत तुमच्या वेबसाईटची, तसेच सोशल नेटवर्क्स ची लिंक जरूर द्या.नेहमी तुम्ही इमेल पाठवाल तेव्हा ही माहिती इमेल मिळणाऱ्या व्यक्तीला पोहोचत राहील.

अशीच सर्व माहिती तुमच्या व्हिजिटिंग कार्ड तसेच लेटर हेड वरही असू द्या.

ही सर्व झाली अगदी मुलभूत परंतु अत्यावश्यक तयारी. आता ह्यापुढे पुढच्या जाहिरात यंत्रणा वगैरे वापरून आणखी जलद गतीने असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण तरीही इतक्या बेसिक तयारीनंतर अगदी नियमितपणे online राहूनही तुम्हाला आश्चर्यकारक असे परिणाम मिळू शकतील.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews