व्यापारी मित्र

‘प्रकल्प मॅनेजमेंट’ अर्थात Project Management

नमस्कार, online marketing द्वारे व्यवसाय वृद्धी यातलं आपण आता पुढचे सदर पाहतोय. यात पाहूयात ‘प्रकल्प मॅनेजमेंट’ अर्थात project management ची साधनं.

Project  Management  म्हणजे काय?

Project  म्हणजे काही मोठाच प्रकल्प असायला पाहिजे, व्यावसायिक प्रकल्पच असायला पाहिजे असं काही नाही. छोटे-छोटे सुद्धा काही प्रकल्प असतात. उदा. आपली विस्तृत स्वरुपात पडलेली काही अनेक कागदपत्रे नीट व्यवस्थित internet वर transfer करणे हा सुद्धा एक project असू शकतो. अर्थात व्यावसायिक प्रकल्प करताना आपल्याला अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. आपल्या ऑफिसमधील सहकारी, बाहेरची काही मंडळी यांच्या मदतीने आपण हे छोटे-छोटे प्रकल्प मार्गाला लावत असतो. हे प्रकल्प मार्गाला लावताना आपण अनेक लोकांची मदत घेतो तर त्या प्रकल्पांमध्ये आपण internet चा किंवा त्याच्यावरच्या साधनांचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर किंवा उपयोग करून घेतो. Online marketing किंवा व्यवसायवृद्धी हा विषय असल्यामुळे आपण साधारणपणे त्याला धरून आता बोलणार आहोत. परंतु याचा वापर तुम्ही विस्तृत प्रमाणात तुम्हाला हवा तसा हवा त्या ठिकाणी करू शकता.

Last Pass :-

प्रकल्प किंवा project management मध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला मी त्यातलं एक साधनं किंवा tool सांगेन  ते म्हणजे ‘Last Pass.’  हे Last Pass काय आहे? तुम्ही जेव्हा internet वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही असंख्य sites वर सतत जात असता. बहुतेक सगळ्या sites तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा password निर्माण करा आणि तुमचे नाव register करा म्हणजे पुढच्यावेळी ‘My Accounts’ च्या tabs मध्ये गेलं की तुम्हाला त्या sites वरच्या अनेक सुविधा वापरता येतात. होतं कसं की वापरत जाता जाता आपण इतक्या ठिकाणी इतके वेगवेगळे  passwords दिलेले असतात की ते आपल्या लक्षातच राहत नाहीत. त्याकरिता Last Pass ही एक खूप सुंदर site आहे. Last Pass वर तुम्ही तुमचे सगळे password share करू शकता. त्यात ते coding स्वरुपात ते store होतात त्यामुळे ते Last Pass चालविणाऱ्या व्यक्तींनासुद्धा तुमचे passwords माहीत नसतात. Software द्वारे ते save केले गेलेले असतात. आणि तुमचा फायदा असा होतो कि Last Pass वरून तुम्हाला पुढच्या वेळी त्या site वरून login करायाचे असेल, उदा. facebook वर login करायचे आहे. तुम्हाला पूर्णपणे सतत तुमचे login & password टाकायची गरज नाही, लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही. हा याचा सगळ्यात पहिला फायदा. दुसरा फायदा असा कि तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुम्हाला जेव्हा share करायचं असेल उदा. एक video तुम्ही तयार केला आहे आणि तुम्हाला तो youtube वर upload करायचा आहे. हा upload करायला तुम्हाला तुमच्या मदतनीसाला सांगायचं आहे आणि तुम्हाला त्याला password मात्र सांगायचा नाही. अश्या वेळी last pass वरून तुम्ही share हे button जर दाबलत आणि त्याला सांगितलंत की password न दाखविता share कर -तर त्याला तुमचा login password वापरता तर येईल पण त्याला login password बिलकुल कळणार नाही. हा एक त्याचा मोठा फायदा आहे. त्यामुळे रिमोट ठिकाणी, म्हणजे तुम्हाला माहीत नसल्येल्या ठिकाणाहुन जर तुम्हाला काम करवून घ्यायचं असेल तरीसुद्धा याचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. Last Pass चे basic version मोफत आहे. हे मोफत version सुद्धा आपल्याला खूप चांगलं काम देतं आणि तुम्ही जर android वरती ते जर install केलंत तर त्याला थोडीशी किंमत आहे, माझ्यामते वर्षाला साधारणपणे ७००-८०० रुपये अशी त्याची किंमत आहे android साठी. पण desktop साठी त्याला काही पैसे पडत नाहीत. Last Pass जरूर वापरा.

Mindmeister :-

तुम्हाला मी मगाशी सतत व्यूव्हरचना-व्यूव्हरचना म्हणतोय. तर तुमच्या या व्यूव्हरचना किंवा strategy किंवा डोक्यात येणाऱ्या विविध ideas किंवा कल्पना या आपल्याला सतत-सतत पुन्हा पुन्हा सुचत नाहीत. तर प्रत्येक कल्पनेचा मेंदूमध्ये एक नकाशा तयार होत असतो. तर हा नकाशा तयार करणे या process ला ‘mind mapping’  असं म्हणतात. हे mind mapping करणाऱ्या काही websites उपलब्ध आहेत. त्यातली अग्रेसर site म्हणजे mindmeister. ही site जर तुम्ही वापरलीत तर तुमच्या कल्पना त्याच्यामध्ये साठवू शकता. त्या present  करू शकता; म्हणजे कोणासमोरही त्या तुम्हाला दाखविता येतील. शिवाय तुमच्या team बरोबर share हि करू शकता. आणि image या स्वरूपात ती download सुद्धा करता येते. mindmeister basic version अर्थातच free आहे. त्याच्यामध्ये एकावेळी तीन mind map तुम्ही बनवू शकता. या free plan ने सुरुवात करायला आजीबात हरकत नाही. खूप सुंदर असं हे mind mapping च tool आहे.

Trello :-

एकदा का तुमची कल्पना आणि रूपरेषा तयार झाली की मग वेळ येते ती तपशीलवार तो project किंवा प्रकल्प manage करण्याची आणि अमलात आणण्याची. अश्यावेळी trello नावचं जे एक साधन आहे ते अत्यंत उपयुक्त पडतं. Trello द्वारे तुम्हाला तुमच्या project चे पूर्ण detailing करता येतं. तुम्हाला तुमच्या विविध सहकार्यांबरोबर project च्या सगळ्या पायऱ्या लिहिता येतात; त्या share करता येतात; काही कागदपत्रे attachment या स्वरूपात जोडताही येतात. तुम्हाला एक-दुसऱ्यांमध्ये कळविताही येतं. आणि trello चा फायदा असा की trello हे अतिशय सोप असं, वापरायला अतिशय सुलभ असं software आहे. आणि याची android ची app आहे ती सुद्धा अत्यंत सुलभ आणि छान आहे. तर trello हे tool मी जरूर recommend करेन.

आणि तुम्हाला जर trello जड वाटत असेल तर अजून एक सोपं tool आहे ते म्हणजे ‘Google Drive’.  Google Drive हे दुसरं-तिसरं काही नसून google ने तुमची documents किंवा तुमची कागदपत्रे google वर ठेवण्यासाठी केलेली एक जागा आहे. Online desktop असंही म्हणता येईल. कारण त्याच्या वरती तुम्हाला कागदपत्रे निर्माण सुद्धा करता येतात. Spreadsheets ज्या excel मध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्यासुद्धा त्याच्यावर तयार करता येतात. असं हे Google Drive हे software सुद्धा तुम्हाला वापरता येतं. तर या project management च्या साधनांनी तुम्ही तुमचा प्रकल्प मार्गाला लावू शकता. धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews