पेट बॉटल्स निर्मितीस चांगली संधी

साधारण १९९५ ची गोष्ट असेल, एका प्रदर्शनाच्या वेळी त्या प्रदर्शनातील खाद्य विभागात बाटली बंद पाणी विक्रीस ठेवले होते. किंमत रु.१०/- होती. सर्व लोकांचं एकच म्हणणं होतं…. “हे खूळ परदेशात चालेल, भारतात अशक्य!” त्याला कारण ही तसंच होतं. आपल्या मंडळींना पाणी “विकत” घेणे हे प्रकरण फारच अनभिज्ञ वाटत होतं. त्या stall धारकाला मी एकदा जाऊन विचारलं देखील… “कोई लेता है क्याये शोवाला पानी?” त्याचं उत्तर अर्थात “कहां साब!” असच होतं. पण काही वेळाने तिथे बिसलेरी कंपनीचे अधिकारी आले, आणि त्यातल्या एकाने मला खास भेटून सांगितल्याचे मला आठवतंय … पाणी फुकट असेल, पण शुद्ध पाणी फुकट नसतं, आणि १० वर्षात तुम्हाला पूर्णपणे उलटं दिसेल, जमाना बदल रहा है

आज त्याचं म्हणणं एक वस्तुस्थिती झाली आहे. खरंच, जमाना बदल गया.

 

सगळीच पेये आता प्लास्टिक (पेट) बाटल्यांत

पूर्वी बहुतेक द्रव पदार्थ = काचेच्या बाटल्या हे समीकरण होतं. पण आता? काही मोजकी पेये सोडली, कि जिथे प्लास्टिक किंवा पेट हे प्रक्रियेतच निषिद्ध आहे, ते सोडल्यास सगळीकडे ‘पेट’ चाच जमाना आलाय. अगदी औषधांच्या बाटल्यांत देखील. महत्त्वाचं म्हणजे रिसायकल करण्याजोगं पेट आता उपलब्ध असल्याने प्लास्टिकच्या पर्यावरणीय धोक्यालाही आटोक्यात आणता येतंय. तो विषय जरी अगदी महत्त्वाचा असला, तरी आपण ह्या लेखात तो शेवटीच घेऊयात. तर ह्या उद्योगातील “वाढती मागणी” ही एक फारच मोठी जमेची बाजू म्हणता येईल.

 

पेट हे वापरायला, हाताळायला अत्यंत सोपे

Pet Bottleपेट हा एक प्लास्टिकचाच प्रकार असल्याने, दाण्यांपासून (granules) बनविले जाते. म्हणजे एक मोठी बाटली बनविताना एक छोटी बाटली हवेनी फुगविली जाते, त्या छोट्या बाटलीला “पेटप्री-फॉर्म” असे म्हटले जाते, तो प्री-फॉर्म हा दाण्यांपासून (granules) बनविला जातो. हेच असते पेट बाटल्या उद्योगाचे प्रमुख raw मटेरीअल, अर्थात कच्चा माल. काचेच्या तुलनेत हे हाताळायला अत्यंत सोपे व सुरक्षितही असते. वाहनांतून नेताना फुटण्याची भीती नसल्यामुळे हे प्रचंड लोकप्रिय झाले. तसेच तुलनेने उत्पादन खर्च खूपच कमी येतो, त्यामानाने यंत्र सामुग्री काही फार विशेष लागत नाही, ह्यामुळे हा “बाटल्या” उद्योग मोठ्या कंपन्यांकडून एकदम लघु उद्योगांत आला. हे छोटे प्रीफॉर्म एका ठराविक साच्यात (mould) मध्ये फुगविले, कि झाली बाटली तयार. इतकं सरळ साधं सोप्पं आहे हे.

 

2-blowing machine copyसेटप काय लागेल?

मिनरलवॉटर च्या साधारण १ लिटर च्या बाटल्या तुम्हाला बनवायच्या असतील, तर एक मुलभूत सेटप खालील प्रमाणे लागेल :

  • २-cavity म्हणजे २ साच्यांचे पेट, त्याला कॉम्प्रेस्सर, हीटर व तत्सम साहित्य ह्यांसाठी (म्हणजे मशिनरी) … रु. ८,५०,०००/-
  • जागा… साधारण १०००-१५०० स्क्वे फुट शेड ( १४ फुट उंच – माळ्यावर stock)
  • वीज कनेक्शन – ३० एचपी.
  • कुलिंग tower ..साचे थंड ठेवण्याकरिता.

ह्यातून दिवसाला साधारणत: ५०००-१०००० बाटल्या निघू शकतात. ह्याला ब्लो मशीन कामगार चांगला लागेल, अथवा तयार करावा लागेल. तसेच साचे, म्हणजे मोल्ड सुद्धा काळजीपूर्वक तयार करून घ्यावे लागतील. पण हे रिसोर्सेस मिळतील. हा अगदी सुरुवातीचा सेटप म्हणता येईल, शिवाय वाढवायचे झाल्यास अगदी तासाला १०,००० बाटल्या निर्माण करणारी ही मशीन्स मिळतात.

(पेट मशीन वर बाटल्या कशा निर्माण होतात ह्याकरिता खालील लिंक वापरून पहा)

 

उपलब्ध बाजारपेठ तसेच धोके

वर सांगितल्याप्रमाणे खाद्यपेये कंपन्या, मिनरल वॉटर, औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्या इत्यादी हे

खूपच उत्तम, तयार, तसेच वाढत जाणारे मार्केट आहे. त्याच बरोबर काही धोके ही आहेत :

  • प्लास्टिक बाटल्या वाहण्याकरिता सुरक्षित जरी असल्या, तरी मोठ्या बाटल्या वाहण्याच्या १/१० खर्चात छोट्या बाटल्या, म्हणजेच पेट प्रीफॉर्म वाहून नेता येतात. त्यामुळे उद्योजक स्वत:च ही मशिनरी उभारतात.
  • ही यंत्र सामुग्री उच्च तंत्रज्ञानावर आधारित (हाय-टेक) नसल्याने त्या मानाने कोणालाही उभारता येवू शकते.
  • प्रगत देशात बाटल्यांवर (पेट) बंदी आणण्याच्या मोहिमा कायम आघाडीवर असतात. ह्याकडे सतत डोळा ठेवायला हवाच !
  • आपल्याकडे रिकाम्या बाटल्या पुन्हा वापरण्याचा प्रघात आहे. बंदी असून देखील असे उद्योग सर्रास चालू असतात. यु ट्यूब वर देखील ह्या  बद्दल खूप व्हिडिओ उपलब्ध आहेत.
  • स्पर्धा. खूप स्पर्धा अनुभवाला येईल. तरी “सिझन” मध्ये पुरवठा करायला कमी पडू नका. अर्थात stock लेव्हल भर भक्कम ठेवायला लागते.

 

कल्पकता हीच गुरुकिल्ली

असं जरी सगळं असलं, तरी उपलब्ध बाजारपेठ पाहता, एक उद्योजक ही संधी सोडणं शक्यच नाही. कल्पकता वापरून तो त्याचा व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याच्या युक्त्या शोधून काढेलच. उदा. अनेक मंडळी मिनरलवॉटरचं फक्त “मार्केटिंग” करतात. अशी संख्या मोठी आहे. त्यांना बाटल्या पुरविता येतील. वेगवेगळ्या मध्यस्थांबरोबर हात मिळवणी करून अनेक प्रकारची नवी “मार्केट्स” निर्माण करता येतील. कल्पक बना, कल्पकतेची कास धरा. ती जाहिरात लक्षात आहे ना?

एक आयडीय , जो बदल दे आपकी दुनिया

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *