व्यापारी मित्र

पूर्वतयारी

नमस्कार, online marketing माध्यमातून व्यवसायवृद्धी या लेखांक मालिकेला आपण सुरुवात करतोय. सर्वात पहिल्या भागात आपण जाणून घेऊयात की याकरीता एक व्यावसायिक, एक उद्योजक किंवा व्यापारी म्हणून तुम्हाला नक्की काय पूर्वतयारी करावी लागेल.

व्यवसायाचे प्रकार

प्रथम व्यवसायाबद्दल जाणून घेऊया­­­त. साधारण कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय असतात. एक व्यवसाय असतो तो trading या प्रकारचा व्यवसाय असतो. त्याच्यामध्ये घाऊक किंवा किरकोळ विक्रेते असतात. दुसरा व्यवसाय असतो तो म्हणजे manufacturing चा. म्हणजे उत्पादन हा व्यवसाय असतो. आणि तिसरे असते कि व्यावसायिक सेवा पुरवणे. हे तीन प्रकारचे व्यवसाय असतात.

Marketing

प्रत्येक व्यवसायाला त्याचे marketing करण्याचे एक ठराविक model असते. काही catalogues असतात, काही मटेरीअल असतं. त्यांच्या विक्रीसाठी तुम्ही ठरवलेले काही मार्ग असतात. उदा. catalogues किंवा माहिती पत्रके म्हटली तर ती विविध ठिकाणी आपल्याला वितरीत करता येतात. उदा. तुमचा जर व्यापार असेल, दुकान असेल, किंवा जर शोरूम या स्वरुपात काही असेल तर तिथे प्रत्यक्ष उत्पादन किंवा जे काही तुम्ही उत्पादने किंवा products ठेवताय किंवा विकताय ती तिथे ठेवली जातात. काही-काही सेवा असतात किंवा काही-काही उत्पादने अशी असतात, उदा. प्रोजेक्टचा व्यवसाय. तो शोकेस मध्ये ठेवता येत नाही, तर त्याची विविध माध्यमातून जाहिरात केली जाते. उदा. directories मधून किंवा वर्तमानपत्रामधून किंवा इतर अनेक प्रकारे. काही प्रदर्शने भरवून वगैरे त्याची जाहिरात केली जाते. या माध्यमातून त्याची विक्री होते. अर्थात प्रत्येक माध्यम ठेवायला एक जागा लागते त्याला ‘commercial space’  म्हणतात. दुकानांसाठी तुम्ही उत्पादने ठेवायला एक वास्तविक स्वरुपात जागा तुम्ही देता. जाहिराती करिता वर्तमानपत्रात तुमच्यासाठी जागा राखून ठेवली जाते त्याला column cm म्हणतात. मासिकांमध्येही त्याला असंच म्हटल जातं; किंवा yellow pages वरून तुम्ही जर जाहिरात करत असाल तर (पूर्वीची पद्धत) त्यात listing या नावाने तुम्ही तुमची जागा आरक्षित करता.

Internet Marketing

Internet वरती जी जागा आरक्षित केली जाते ती कुठल्या स्वरूपात असते? साधारणपणे कल्पना करा की अशाच प्रकारे internet वरती काम चालतं. Internet हे एक मोठे सुपर-मार्केट किंवा मोठे मॉल आहे अशी कल्पना करून तुम्ही त्याच्यामध्ये तुमची website म्हणजे उत्पादन त्या जागी ठेवू शकता. तुम्ही त्याला तुमचे दुकान असे पण म्हणता येईल आणि त्या जागेचं भाडे दिले जाते, त्याला म्हणतात ‘hosting charges’.

जागा आरक्षित करण्याचा दुसरा प्रकार असा कि या मोठ्या सुपर-मार्केट मध्ये ज्याला आपण internet म्हटलंय, त्याच्यामध्ये इतर काही छोटी छोटी markets असू शकतात. त्यांना आपण portals म्हणतो. Portals चं उदाहरण घ्यायचं झालं तर ‘Just dial*’, ‘India mart*’ किंवा ‘Trade India*’ याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. त्यांच्याकडे listing दिलंत की तुमचं उत्पादन ते तिकडे वितरीत करतात. अशाप्रकारे internet वर तुम्ही तुमचं उत्पादन वितरीत करू शकता.

प्रत्यक्ष व्यवहार कसा होतो?

प्रत्यक्ष विक्री होते कशी? तर ती अशी होते- तुमचं उत्पादन online जिथे ठेवलं आहे लोकं विविध पद्धतीने ते शोधतात. त्यासाठी Google हे एक Search Engine वापरलं जाते. त्याच्यावरून लोकं त्यांना हवे असलेल्या उत्पादनाबद्दलचे परिचित शब्द ते टाकतात. त्याला online परिभाषेत keywords असं म्हटलं जातं. तर हे keywords टाकले की लोकांना तुमचे उत्पादन इतर अनेक उत्पादनासोबत दिसते. मग ग्राहक तुमचे उत्पादन त्या इतर अनेक उत्पादनासोबत compare (तुलना) करतात; तपासून पाहतात, फरक पाहतात. त्यांना जर योग्य वाटले तर ते उत्पादन घेतातही. काही वेबसाईट असतात उदा. Flipkart*. या website वरून जर तुम्हाला एखादा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही पटकन त्या स्मार्टफोन ला निवडून तुम्ही तिथल्या तिथे त्याची खरेदी करू शकता. आणि तुमच्याकडे ते उत्पादन येऊ शकते. या प्रकारच्या website ला e-commerce website असं म्हणतात, ज्याच्यामध्ये commerce म्हणजे प्रत्यक्ष उद्योग किंवा transaction किंवा व्यापार पूर्ण झाला. अश्या या e-commerce website असतात. Amazon.in* व olx* या e-commerce website आहेत. तर अश्या प्रकारच्या websites वरून तुम्हाला e-commerce करता येतो; म्हणजे वस्तू विकत घेता येतात. इतर काही प्रकारच्या व्यवसाय उदा. projects किंवा services (सेवा) या व्यवसायात तिथल्या तिथे प्रत्यक्ष व्यापार होऊ शकत नाही. तर लोकं तुम्हाला संपर्क साधतात आणि नंतर संपर्क साधून तुम्ही त्यांच्याशी वेळ ठरवून नंतर संपर्कात राहून पुढे व्यवसाय करता येतो. या प्रकारच्या websites ना साधारणपणे ‘lead selling’ websites असं म्हटल जातं. तर ‘lead selling’ आणि ‘e-commerce’ हे व्यापाराचे प्रमुख २ मार्ग आहेत ज्या मार्गांनी तुम्हाला व्यवसाय करता येयील. तर पूर्वतयारी मध्ये आपण एवढं सगळ जाणून घेतलंय. यानंतर पुढच्या लेखांकामध्ये आपण website झाल्यानंतर पुढे काय करायचं हे बघुयात. धन्यवाद.

* संदर्भ सूची:

www.justdial.com

www.indiamart.com

www.tradeindia.com

www.flipkart.com

www.amazon.in

www.olx.com

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews