शिक्षणवेध

तुमचे Online “प्रोफाईल” तयार करण्यासाठी १० पथ्ये

download

तुमचे Online “प्रोफाईल तयार करण्यासाठी १० पथ्ये

गेल्याच लेखात (मे २०१६) आपण पाहिलं की, इंटरनेटमुळे अनेक छोट्या छोट्या गावांतील, शहरांतील व्यक्तीसुद्धा त्यांच्या घरातून कामे करून देऊ शकतात, करून घेऊ शकतात. अगदी छोट्यात छोट्या प्रमाणात एक संगणक व जोडीला एक इंटरनेट कनेक्शन इतका सुद्धा सेटप पुरेसा आहे. तरीही प्रत्यक्ष काम देण्या-घेण्या पूर्वी कोणत्या बाबी  प्रथम पहिल्या जातात, हे पाहूया. काम मिळवावयाचे झाल्यास काय, हे इथे पाहूयात.

आम्ही कोण म्हणून काय पुसता? हा बाणा कामाचा नाही !

साधारणत: होतं काय, की आपण आपापल्या कामात तरबेज असलो, आणि जर स्थानिक पातळीवर जर आपलं थोडं-फार नाव वगैरे झालेलं असेल, तर आपल्या कामाबद्दल आपल्याला थोडा अभिमानही निर्माण झालेला असतो. स्थानिक पातळीवर हे “नाव” + आपल्याला ओळखणारी मंडळी ह्यामुळे बऱ्याचदा आपल्याकडे कामे समोरून येतात, अथवा आपल्याला आपल्याविषयी फार सांगायलाही लागत नाही. नवखे असाल तर सांगायची आवश्यकता भासते, पण तरीही प्रत्यक्ष भेटीत देहबोली वगैरे बरचसं निभावून नेत असते. त्यामुळे समोरची व्यक्ती काम देताना अथवा आपल्याकडून काम घेतानाही आपल्याबद्दल बरं वाईट मत बनवते व त्याचा प्रभाव त्या त्या व्यवहारावर पडतो.

इंटरनेट ची गणितं वेगळी

परंतु इंटरनेट वर मात्र हे शक्य नसते. इंटरनेटवर तुमच्याबद्दल जे काही बरं वाईट मत तयार होईल, ते समोर… स्क्रीनवर दिसेल त्यावरूनच! गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे, कामे देणाऱ्या-घेणाऱ्या ज्या काही साईट आहेत त्यांवर तुमच्यासाठी Your Profile किंवा My Profile हा एक खास विभाग असतो, इथेही माहिती देता येते.

माहिती देताना पाळावयाची पथ्ये

  1. खरी खरी माहिती लिहा. उगाचच टोपण नावे वगैरे नका घेऊ.
  2. माहिती देताना एक फ्लो ठेवा. मध्येच वाहवत जाऊ नका. वर्णनं नकोत.
  3. प्रश्नोत्तर स्वरुपात संवाद असेल, तर मोजकंच लिहा. अगदी objective.
  4. जेथे जेथे तुमच्या वेब साईट बद्दल, सोशल पेजेस बद्दल विचारलं असेल, तिथे तिथे न चुकता, न विसरता ते नोंदवा. त्याला प्रत्यक्ष साईट “लिंक” करण्याची सोय असल्यास जरूर करा. वेब साईट असेल, तरच हा प्रश्न उद्भवेल, नसेल, तरीही काही बिघडत नाहीये.
  5. केलेल्या कामांच्या ठिकाणी पूर्वी केलेली छोटी छोटी कामे देखील आवर्जून आठवा, लिहून काढा. काम कसं मिळालं हे लिहिण्याची आवश्यकता नाही, परंतु काम काय करून मागितले व काय नक्की करून दिले हे मोजक्या शब्दांत परंतु नेमके नक्की लिहा.
  6. तुमचे त्या प्रकारचे विशेष शिक्षण झाले असेल, तर तशी कागदपत्रे तसेच तुम्हाला विशेष करून मिळालेले काही सन्मान व ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया हे जरूर “अपलोड” करा.
  7. संपर्कासाठी पत्ता अथवा तपशील देताना, तुमचे कार्यरत दूरध्वनी क्रमांक, SKYPE क्रमांक, इमेल इ. व्यवस्थित द्या.
  8. हि कामे जगाच्या विविध भागांतून येतात. जास्त करून अमेरिकेतून, ब्रिटन वगैरेतून येतात. त्यांचा Time Zone जाणून घ्या. एकट्या अमेरिकेतच ४ Time Zones आहेत. त्याप्रमाणे तुमचं घड्याळ तुम्हाला सेट करावं लागेल. अर्थातही इंटरनेट वरची मंडळी खूपच जास्त सामावून घेणारी असतात, हे तुम्हाला लवकरच उमगेल.
  9. Internet वरून काम, म्हणजे २४ x ७ online असं अजिबात नाही. तुमच्या वेळा तुम्ही ठरवा, त्यांनुसार कामे चोख करा. फक्त ह्या प्रोफाईल मध्ये ह्या उपलब्ध वेळा व्यवस्थित लिहून ठेवा. इंटरनेट वरील कंत्राटदारांना चोख पणा अतिशय भावतो.
  10. शेवटचे, परंतु महत्त्वाचे : तुमचा एखादा पासपोर्ट साईज मधला फोटो (एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराकडून काढून घेतलेला) इथे पोस्ट करा. कितीही म्हटलं; तरीFirst Impression is the Lasting Impression असतंच.

पुढच्या लेखात आपण एखादे “जॉब पोस्टिंग” कसे करायचे ते पाहूयात.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews