व्यापारी मित्र

ग्राहक सेवा-संवाद

ग्राहक सेवासंवाद

नमस्कार, online marketing द्वारे व्यवसाय वृद्धी यातलं आपण आता पुढंच सदर पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहूया कि – ग्राहक सेवा आणि संपर्क साधनं आपण कशी वापरायची.

CRM

सर्वात प्रथम आपण पाहतोय ती एक सेवा म्हणजे CRM. अर्थात Customer Relationship Management. एकदा का आपल्याकडे एखादी enquiry किंवा lead किंवा विचारणा झाली, की प्रत्येक उद्योजकाला त्यांच्याशी पुढे विविध प्रकारे संपर्क ठेवायला लागतो. संपर्क ठेवणे याला आपण ‘Follow-up’ असं म्हणतो.

Follow-up चे महत्त्व

तर प्रथम ‘follow-up  म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेउयात. Follow-up म्हणजे गिऱ्हाईकाला नको असताना त्याला emails करत राहणे, नको असताना त्याला SMS देत राहणे; किंवा नको असताना त्याला पत्रे पाठवत राहणे, आणि त्याला फोन करून हैराण करणे असं आजिबात नाही. Follow-up म्हणजे तुम्ही जे सांगताय की मी अमुक- अमुक करीन, ते करणे.  बस ! इतकाच छोटासा, साधा याचा अर्थ आहे. उदा. तुम्हाला एखादी विचारणा झाली कि तुमचं अमुक-अमुक यंत्र हे किती किंमतीला पडतं, किंवा तुम्ही हे तुमचं जे shop आहे याच्यावरून deliveries किती व कुठल्या ठिकाणापर्यंत तुम्ही देता, किंवा तुमच्या अमुक पुस्तकाची किंमत इतकी इतकी आहे, हे कधीपर्यंत आहे, अशी तुम्हाला विचारणा झाली आणि तुम्ही जर त्यांना संपर्क साधलात, त्यांना सांगितलंत की आज माझ्याकडे अमुक-अमुक पुस्तकाची किंमत उपलब्ध नाही. तुम्हाला आम्ही तीन दिवसात कळवतो. तर ते वेळेवर कळवणे हा झाला ‘Follow-up’. तुम्ही साधारण ठरवू शकता तुमच्या व्यवसायाच्या पद्धती प्रमाणे किंवा व्यवसायाच्या स्वरूपा-प्रमाणे की तुमच्या ग्राहकाला किती वेळा सदर फोन करायचे किंवा संपर्क-माध्यमातून संपर्क साधायचा. कधी-कधी असे projects असतात; मोठे-मोठे त्यात २-२, ३-३, ४-४ वर्ष सुद्धा follow-up ठेवायला लागू शकतो.  तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही follow-up बद्दल ठरवू शकता.

पण CRM हा प्रकार यामध्ये अतिशय कामाला येऊ शकतो. CRM मध्ये तुम्हाला पुढचे फोन कधी करायचे आहेत हे तुम्ही टाकू शकता. आलेल्या माणसाची पूर्णपणे माहिती एकदा तुमच्याकडे तुम्ही नोंदवून ठेवू शकता. काही-काही CRM वरून तुम्हाला त्यांच्याशी chat करण्याची माध्यमे सुद्धा मिळतात. त्यांना emails तुम्ही करू शकता. विविध प्रकारचे surveys तुम्ही त्याच्यावरून घेऊ शकता. हे सगळं एकाच ठिकाणावरून, एकाच website वरून जाऊ शकत. फायदा असा कि तुम्हाला word, excel, email, SMS आणि mail सेवा या वेगळ्या वेगळ्या वापरायची गरज पडणार नाही. एकाच ठिकाणावरून हे सगळं handle होईल. दुसरी गोष्ट- तुमच्याकडे जर तुमची team असेल तर team मध्ये सुद्धा हे share करू शकता. म्हणजे तुमचे विविध salesman असतील तर ते एकच CRM वापरतील. आणि त्या प्रत्येकाचे कामही तुम्ही पडताळून पाहू शकता.

आता हे CRM विविध प्रकारच्या व्यवसायांकरिता अतिशय उपयुक्त असं ठरतं. राहिला प्रश्न किंमतीबाबत! तर साधारणपणे एक बारा ते पंधरा हजार रुपये प्रती वर्ष, असं हे किफायतशीर ठरू शकत. अत्यंत उपयुक्त असं हे CRM च software आहे.

संपर्क साधायचं दुसंर मध्यम म्हणजे ‘chatting software.’ याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट गणलं जातं ते म्हणजे skype. Skype हे दुसंर-तिसर काही नसून chatting च माध्यम आहे. तुम्ही Skype नुसतं download करा म्हटलं कि Skype तुमच्या कॉम्पुटर वर किंवा तुमच्या मोबाईल वरती सुद्धा पटकन download- म्हणजे उतरविता येतं. Skype चं बेसिक account free आहे. म्हणजेच ‘Skype to Skype’ तुम्हाला फ्री बोलता येतं. फ्री chatting करता येतं, अगदी कुठेही. याशिवाय Skype चा फायदा म्हणजे दूरदेशी आपण जे calling करतो, त्याच्याकरिता Skype नक्कीच उपयुक्त आणि स्वस्त पडतं. म्हणजे बाहेरच्या माणसाला तुम्ही इथून फोन करू शकता आणि तेसुद्धा कमी दारामध्ये. आणि त्याच्यावर तुम्ही $10 पासून कितीही prepaid असा balance ठेवू शकता. Skype मध्ये तुम्हाला बोलता-बोलता विविध प्रकारचे groups तयार करता येतात. तुम्हाला Skype मध्ये screen सुद्धा share करता येतो. म्हणजे तुमच्या कॉम्पुटर वर काय चाललं आहे हे दुसऱ्याला दाखविता येऊ शकतं. अर्थात Skype हे chatting च खूप चांगलं software आहे, आणि बोलण्यासाठी सुद्धा. तुम्ही जर स्वतः उपलब्ध असाल तर तुम्हाला front camera ने तुमचा चेहरा सुद्धा- video chatting सारखा share करता येतो.

असंच एक व्यावसाईक software मगाशी म्हटल ते म्हणजे Alibaba चं “Trade Manager.” हे खूप छान chatting ची रूम आहे. याच्यामध्ये Skype इतक्या सुविधा जरी नसल्या तरीसुद्धा Alibaba या platform वरती फक्त व्यावसाईक लोकांसाठी असलेलं हे खूप सुंदर software आहे.

G-Talk आपण वापरतोय, पण मी आत्ताच ऐकल्याप्रमाणे G-Talk ही सेवा google लवकरच बंद करणार आहे. पण Skype हे तुम्हाला खूप सुंदर पडेल. Skype मोफत आहे आणि तुम्हाला वापरायला हे अतिशय उपयुक्त असं साधनं आहे. तिसर अत्यंत उपयुक्त आणि सध्या अत्यंत प्रचलित असलेलं साधन म्हणजे Whatsapp. हे तुम्हाला photo share करायला किंवा तुमच्या उत्पादनाचे video share करायला किंवा काही कागदपत्रे share करायला अत्यंत उपयुक्त साधन आहे. Whatsapp चा फायदा असा की groups मध्ये पटकन share होत. फार जणांपर्यंत तुम्हाला share करत बसायला लागत नाही. Whatsapp हे पूर्णपणे मोबाईल वरती वापरता येतं. खूप सहजपणे वापरता येतं आणि याचा वापर खूप प्रचलित आहे.

शिवाय ‘Teamviewer’ नावाचं अजून एक software आहे. याचं basic version मोफत आहे. Support देण्यासाठी Teamviewer हे अत्यंत चांगलं गणलं जात. वापरायला अतिशय सोपं आहे, पटकन download होतं. तुम्हाला तुमच्या एखाद्या software ची माहिती किंवा एखाद्या उत्पादनाची माहिती द्यायची असेल आणि ‘Online Transactions’ समजावून सांगायची असतील तर Teamviewer सारखं संपर्क साधनं नाही. खूप सुंदर आहे.

तर ही संपर्क साधनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वापरता येतील. धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews