शिक्षणवेध

ई-लर्निंग-Trello

नमस्कार, e-learning टिप्स मध्ये स्वागत! e-learning टिप्समधील पूर्वतयारी या प्रकारातलं एक अखेरच तंत्र आपण शिकणार आहोत. ते म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन. हा प्रकल्प म्हणजे तुमचे छोटे छोटे प्रकल्प किंवा त्याच्या आतमधील इतर प्रकल्प जे असतील. या सगळ्याचे तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थापन करावे लागेल. म्हणजेच त्यातील तुम्हाला काय कामे करायची आहेत, काय ध्येये ठरली आहेत, हे लिहून ठेवायला लागेल. त्यातील उपध्येयेहि तुम्हाला लिहावी लागतील. त्या मार्गावरचे टप्पे, त्या मार्गावरती कार्यरत असणारा तुमचा गट आणि त्याला लागणारी कागदपत्रे हे सगळ एकाच ठिकाणी तुम्हाला ठेवाव लागेल. तर हा जो प्रकल्प ज्याचे तुम्ही व्यवस्थापन करणार आहात, तर त्याच्याकरता एक अत्यंत उपयुक्त असं ट्रेलो (trello.com) नावाच टूल आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया.

तुमचा जो छोटा प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आहे, त्याचा तुम्ही प्रोजेक्ट ऑफिस असाच विचार करा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपे पडेल. तर ट्रेलो मध्ये काय काय करता येत? तर बोर्ड्स नावाची एक कन्सेप्ट आहे, बोड्स म्हणजे विस्तृत प्रमाणावर विचार केला तर साधारणपणे तुम्ही कुठे प्रोजेक्ट हाताळताय.

e-learning जे काम तुम्ही हातात घेतलं आहे, यामध्ये कदाचित तुमचं जे प्रमुख उद्दिष्ठ असेल ते म्हणजे तुमचा एक बोर्ड तयार होईल, बोर्डच्या आतमध्ये तुमच्या लिस्ट असतात. म्हणजे त्यातली काही कामे वेगळी-वेगळी असतील. आणि लिस्ट च्या आतमध्ये गार्ड्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. तर याद्वारे तुम्ही तुमची विविध कामे त्यांच्या याद्या, त्यांच्या ठरलेल्या तारखा हे सगळ तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकताय. माईंड-मॅपिंग टूल मध्ये ज्याप्रमाणे तुमच्या आयडीयाज (कल्पना)चा बोर्ड होता, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट अमलात आणताना तुम्हाला जे काम करायचे आहे, जे प्रकल्प व्यवस्थापन करायचे आहे त्याच्यासाठी ट्रेलो हे अतिशय उपयुक्त टूल तुम्हाला कामाला येईल. ट्रेलो-चा फायदा असा कि या एकाच ठिकाणी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रे ठेवता येतील. तसेच तुम्हाला तुमच्या इतर सहकार्यांबरोबर ती शेअर सुद्धा करता येईल. तर हा ट्रेलोचा फायदा आहे. आणि अश्याप्रकारे आपण काय करतोय कि यातून तुमची e-learning ची पूर्वतयारी झाली असं समजतोय. तर ट्रेलो हे यातील शेवटचे टूल होते. धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews