शिक्षणवेध

ई-लर्निंग-Mindmeister

यातील पुढचे तंत्र आता आपण बघुयात. ते म्हणजे माईंड-मॅपिंग (mind-mapping) हे तंत्र आपण शिकणार आहोत. Mind-mapping म्हणजे काय? तर आपल्या मेंदूत येणाऱ्या विविध कल्पनांचा एक नकाशा करून ठेवणे. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये Tony Buzan या नावाच्या व्यक्तीने पुस्तकाद्वारे mind-mapping हे technique खूप सुंदरपणे share केलंय. Computer वर काम करताना तुम्हाला या technique चा प्रचंड उपयोग होतो.

प्रथम म्हणजे तुम्ही जे e-learning करताय, ह्या e-learning च्या आधी तुमच्या डोक्यात एक विशिष्ट कल्पना आहे. तुमच्या डोक्यात एक विषय तुम्ही धरलेला आहे. आणि त्या धरलेल्या विषयानुसार तुम्हाला कुठली कुठली माहिती संपादन करायची आहे, काय शिकायचे आहे किंवा काय तुमचे ध्येय आहे, अश्या प्रत्येक कल्पना तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या स्वरुपात मांडता येईल. त्यामुळे प्रत्येक कल्पनेचा जो नकाशा आहे तो जर तुमच्या सतत बरोबर राहिला तर हे खूप चांगले राहील.

अशा ठिकाणी mind-mapping हे technique किंवा तंत्र खूपच उपयोगी पडते. जसे Tony Buzan चे पुस्तक आहे, त्याप्रमाणे इंटरनेट वरती mind-mapping च्या असंख्य sites आहेत. पण मी जी site वापरतो ती म्हणजे mindmeister.com. या mindmeister website चे सुरुवातीचे version मोफत आहे.

तुम्ही तुमचे ३ mind-map तिथे तयार करू शकता. तर या mind-map मध्ये तुम्हाला असा फायदा होतो कि तुम्ही तुमच्या डोक्यातल्या कल्पना अगदी सुसंगतीने त्याच्यात टाकू शकता. नंतर तुमच्या कल्पना तयार झाल्या कि तुम्हाला त्या कल्पनांचा जो नकाशा तयार झालाय त्याचे file स्वरूपातील चित्र तुम्हाला download करता येते. त्यालाच export असंही म्हणतात. यामुळे तुमचा नकाशा सतत तुमच्याबरोबर राहील. अर्थात mindmeister site वर तुम्ही गेलात कि सतत “My Maps” या सदराखाली तुमचे mind-maps (म्हणजेच तुमच्या कल्पनांचे नकाशे) हे तुमच्या बरोबर राहतील. याला फक्त internet connection ची आवश्यकता असते. आणि मी सांगितले त्याप्रकारे पहिल्या ३ maps ला हे mind-mapping tool पूर्णपणे मोफत आहे. याचा अजून एक फायदा असा की तुम्ही त्याचे presentation म्हणजे सादरीकरण तयार करू शकता. त्यासाठी त्यांनी खूप छान icons दिले आहेत की जेणेकरून तुम्हाला सादरीकरण सजविता येईल. आणि lessonsघेताना हे खूप उपयुक्त ठरते असं दिसून येतंय. तर हे mind-mapping tool बद्दल आपण थोडेसे बघितले.  पुढच्या लेखात पुढचे तंत्र बघूया. धन्यवाद

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews