शिक्षणवेध

ई-लर्निंग-LastPass

नमस्कार,

E-learning tips मध्ये आता आपण पुढचे तंत्र बघुयात. या तंत्राचे नाव आहे ‘lastpass’. आता lastpass हे काय आहे? Lastpass ही नक्कीच एक website आहे. Lastpass मध्ये काय होते?

तर तुम्ही आता शोध-मोहीम चालू कराल किंवा तुम्ही internet अतिशय प्रगतपणे किंवा भरपूर वापरायला सुरु कराल. Internet चा भरपूर वापर म्हणजे भरपूर websites search करणे. या विविध websites वरची माहिती सतत वापरायची असेल तर तुम्हाला login करावे लागते. हे login करताना तुम्हाला विविध प्रकारची माहिती सतत भरायला लागते. जसे तुमचे नाव, तुमचा फोन नंबर, तुमचा email id, इत्यादी. काही नाही तरी तुम्हाला कमीतकमी तुमचा email id आणि तुमचे नाव हे तर तुम्हाला असंख्य ठिकाणी वापरायला लागते. होते असे कि वापरत जाता जाता कुठल्या websitesवर तुम्ही कोणते नाव टाकलेत, कुठला email id टाकला, काय password आहे?..हे आपल्या लक्षातच राहत नाही. आणि मग गोंधळ उडतो. कळतच नाही कि कुठे काय store केलंय!

अशा ठिकाणी lastpass सारखी website आपल्या प्रचंड मदतीला धावून येते. Lastpass का वापरायचे? तर प्रथम म्हणजे हि site विनामुल्य आहे. ती वापरताना तुम्ही ज्या कोणत्या website वर तुमचा password share केलंय हे lastpass लक्षात ठेवते. म्हणजे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा त्या site वर जाल, तेव्हा lastpass तुम्हाला आपोआप येऊन पूर्वसूचना देते आणि विचारते कि तुम्हाला तुमच्या password आणि नावाने login करायचे आहे का? आणि ते तुमचे login करून देते.

हि एक खूपच मोठी utility आहे. जरी lastpass या कंपनीकडे आपली माहिती (information) राहते आहे असे आपल्याला दिसले तरी ती सुरक्षित असते. कारण त्यांनी त्यांची यंत्रणा अशी तयार केली आहे कि त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्या password ची माहिती राहत नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याचा फायदा नक्की आहे, परंतु तुमचा lastpass चा master password असतो तो मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायला हवा. तो जर विसरलात तर गडबड होवू शकते. का वापरायला हवं हे आपण आत्ता पहिले. असंच lastpass चे जे मुख्य version आहे, जे desktop किंवा computer वर वापरायचे आहे, ते मोफत आहे. त्याच्यामध्ये premium version सुद्धा आहे. परंतु सुरुवात करताना मोफतने सुरुवात करा.

Android वर हेच version तुम्हाला वापरता येईल. परंतु त्याला खर्च आहे. साधारण रूपये ७००-८०० वर्षाला. असा तो खर्च तुम्हाला येऊ शकतो. अर्थात तुमचा काय वापर आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. कसं वापरायचे हे आपण आत्ताच बघितले. याच्याने अजून एक असा फायदा होतो कि तुम्हाला विचित्र पद्धतीचे passwords तयार करता येतात आणि ते टाकता येतात कि जेणेकरून ते पटकन copy होवू नयेत किंवा hack होऊ नयेत. हा फायदा होतो. Lastpass चा अजून एक असा फायदा आहे कि तुम्ही तुमचे जे कर्मचारी किंवा सहकारी आहेत त्यांच्याबरोबर तुमच्या sites तुम्ही share करू शकता. हे “sate share” करताना म्हणजे वाटून घेताना नॉर्मली आपल्याला user id आणि password द्यायला लागतो, जो lastpass वर द्यायला लागत नाही. तो बंद स्वरूपात राहतो. म्हणजे त्यांना वेबसाईट website वापरता येईल पण तुमचा user id आणि password दिसणार नाही. lastpass वरून तुम्हाला असंख्य प्रकारचे forms अतिशय जलद गतीने भरता येतात. अशी हि lastpass यंत्रणा आपल्याला बहुमोल उपयोगी पडते. धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews