शिक्षणवेध

ई-लर्निंग-Bookmarking

नमस्कार, E-Learnig टिप्स मधलं पूर्वतयारी बद्दलचं दुसंर पाऊल आता आपण टाकणार आहोत. गेल्या लेखात आपण पाहिलं कि ‘Folder Logic’ म्हणजे काय आणि folder logic  द्वारे आपण विविध विषयांवरती आपण करत असलेला अभ्यास कसा वेगवेगळ्या ठिकाणीorganise करून ठेऊ शकतो. आता यातलं दुसंर तंत्र आपण शिकणार आहोत, ज्याने आपण आपली कागदपत्र अर्थात इ-कागदपत्र कशी वेळोवेळी शोधून महत्वाच्या खुणा करून ठेऊ शकतो. या तंत्राचं नाव आहे  “bookmarking.”

Bookmarking म्हटल्या म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर उभं राहत ते म्हणजे पुस्तकात असलेल्या आपल्या खुणा. हो, अगदी बरोबर! Bookmarking जेव्हा तुम्ही computer वर वापरता, अश्याच प्रकारे आपण हे करतोय. हे कसं करायचं हे आपण बघूया. तत्पूर्वी ते महत्वाचं का आहे हे समजून घेऊया. पुस्तकांप्रमाणे आपण एक पुस्तक वापरत असताना एखादीच खुण ठेवतो किंवा दोन खुणा ठेवतो. मात्र computer वर काम करताना, particularly Internet वर काम करताना आपण असंख्य websites वर काम करत असणार. त्या websites वर आपण अनेकवेळा अनेक पान पाहत जाणार. आणि ती पान आपल्याला महत्वाची वाटतील. कधीकधी आत्ता महत्वाची वाटतील आणि नंतर आपल्या लक्षात राहणार नाहीत. अशी शक्यता खूप असते. तर हे होऊ नये याच्याकरिता bookmarking हे अतिशय महत्वाचं असं तंत्र आपण शिकणार आहोत.

आता बघूया bookmarking कसं करायचं. तुमचा जो computer चा पुढे पडदा दिसतोय- तो screen, त्याच्या वर एक “bookmark” नावाचा option दिसेल तुम्हाला. तर अगदी सोपं आहे- कुठलीही website किंवा कुठलंही पान तुमच्या समोर जे असेल, ते तुम्हाला जर महत्वाचं वाटलं, तर त्याच्यावर तुम्ही bookmarking असा option select करा, आणि ते साठवून ठेवा. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, कि त्याच्यामध्ये तुम्हाला एक पर्याय दिसेल आणि तुम्हाला निवडता येईल कि त्या bookmark केलेल्या folder (याच्यात सुद्धा folder आहेत,) ला काय नाव द्यायचं? परत विषयवार त्याची वर्गवारी केलीत तर तुम्हाला हे सापडायला अतिशय सोपं जाईल. हे झालं तुमच्या computer वर bookmarking.

शिवाय Online Social Bookmarking नावाच्या काही websites असतात जसं कि “Digg” नावाची एक website आहे. किंवा  “stumbleupon”  हि एक website आहे, “yahoo” ची पण site आहे. अश्या अनेक Social Bookmarking Websites आहेत. त्यापैकी एखादी website जर तुम्ही निवडली आणि त्याच्यावरती bookmarking करायला सुरुवात केलीत तर तुम्हाला तुमचे bookmarks जगभर तुमच्या मित्रांसमवेत share सुद्धा करता येतात. म्हणजे ४-५ जण एकत्र काम करून तुम्ही एकमेकांचे bookmark एकमेकांकडे वापरूही शकता. त्याला “Exchange” करणं म्हणतात. तसंही तुम्ही करू शकता.

इथे जाताजाता एका सुंदर असं Tool ची तुम्हाला मी ओळख करून देतो. त्याचं नाव आहे “pocket.” Pocket या site द्वारे असं होतं कि तुम्हाला जी आत्ता कुठली महत्वाची site वाचायची आहे किंवा त्याच्यावरचा मजकूर वाचायचा आहे ती तुम्ही त्या pocket ला add करून टाकायची. ती add केली कि तुम्ही सवडीने नंतर pocket मध्ये जे काही तुम्ही टाकलेलं आहे, ते तुम्ही pocket मधून काढून वाचू शकता.

Pocket मध्ये अजून एक उत्तम सोय अशी आहे- कि तुम्हाला जर सतत वाचायचा त्रास होत असेल तर तुम्ही तेच document‘audio –form’ मध्ये convert करू शकता. त्यात TTS नावाचा एक option आहे. “Text To Speech.” तो वापरून तुम्ही pocket द्वारे तुमच्या आहे त्या मजकुराचा audio तयार करून ऐकू शकता. अशा प्रकारे आपण या लेखात bookmarking विषयी माहिती बघितली. धन्यवाद.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews