शिक्षणवेध

इ-लर्निंग (E-Learning) ला सुरुवात करण्याआधी

Download Article

नमस्कार, E-Learning  च्या टिप्स ला सुरुवात करण्याआधी आपण सर्वात प्रथम हे  जाणून घेउयात कि आपण  वेळोवेळी जे काही Internet वर शोध घेऊ, किंवा काही आपण त्याच्यात तक्ते तयार करू, काही documents निर्माण करू, वगैरे, वगैरे. हे सर्व जे आपण कागदपत्रे तयार करू, जी खरं तर soft-form मध्ये असतील. “soft-form” म्हणजे हे प्रत्यक्ष आपण कागदपत्र या स्वरूपात नसल्यामुळे आपल्याला हि त्याची विभागवार किंवा वर्गवार किंवा विषयवार त्याची रचना करून ठेवायला लागेल. तर याच्यासाठी आपल्याला काही नियम पाळायला लागतील, काही तंत्र वापरायला लागतील. तर हि आपण थोडीशी जाणून घेवूयात.

रचना :

तर याची कल्पना करताना साधारणपणे अशी कल्पना करूया – कि ज्याप्रमाणे आपल्या घरात काही कपाट असतात किंवा आधी घरामध्ये खोल्या असतात. तर तुमचा computer  हे तुमचं घर असणार आहे. घरातल्या ज्याप्रमाणे खोल्या आहेत, त्या खोल्यांप्रमाणे computer चे विविध drives असणार आहेत. ज्याला आपण म्हणतो – A drive, B drive, C drive, D drive, E drive. याच्यात आपण खोलात शिरत नाही आहोत, परंतु त्यात जे drives आहेत त्या तुमच्या खोल्या आहेत असं समजा. आणि प्रत्येक drive वर काही folders असतात. Folder ही संकल्पनाच आपण तुम्हाला समजावून सांगतोय. हा folder म्हणजे ती कपाटं आहेत असं समजूया. तर या कपाटामध्ये विविध कप्पे असतील. म्हणजे ते “Sub-folder” तयार होतील. आणि त्या विविध कप्प्यांमध्ये आपले घरातले जिन्नस असतात. तर त्या तुमच्या विविध file या स्वरूपात तुमची माहिती सगळी साठवली जाणार आहे.

तर, हे करताना सगळ्यात प्रथम आपण एक काळजी जरूर घ्यायला हवी की, आपण कुठल्या विषयांनुरूप ते folders करणार आहोत. तर, सर्वोत्तम पर्याय असा राहील – कि तुम्ही drives वरचा एक drive या e-learning ला देऊन टाका. D drive समजा निवडलात किंवा E drive निवडलात कॉम्पुटरवरचा तर त्या drive ला तुम्ही चक्क “e-learning” हे नाव द्या. म्हणजे सगळीच्या सगळी माहिती तुम्ही साठवत चाललात, ती एकाच ठिकाणी तुम्हाला साठवली जाईल. म्हणजे थोडक्यात घरातल्या एकाच खोलीत तुम्ही तुमची शिक्षणाची लायब्ररी तयार करताय, असा थोडासा अर्थ त्याच्यामध्ये होईल.

प्रत्येक विषयानुसार तुमचं काम साठवा

आता तुम्ही जेंव्हा जेंव्हा जे जे काही काम विविध ठिकाणी वाचाल, Internet वर किंवा audios असतील, videos असतील आपण बघू एकेक पुढे कसं करायचं ते. परंतु हे साठवताना तुम्ही त्या त्या विषयांनुरूप त्याला नंतर अनेक कप्पे तयार होतील या folders मध्ये. ते folder म्हणजे कपाट आहेत असं समजूया. त्या कपाटाला तुम्ही नाव देऊ शकता. उदा. तुम्ही समजा आता विविध management च्या शिक्षणाचे कुठले कुठले मुद्दे आहेत, हे जर आपण विषयवार त्याचा अभ्यास करायचा झाला, तर management ची कॉलेजेस कुठली, management वरकुठले विषय शिकवले जातात, management मधली कुठली कुठली पुस्तके मिळतात या विविध विषयांचा तुमचा अभ्यास राहील, ज्याला आपण e-learning म्हणतोय. हा अभ्यास तुम्ही वेगळ्या वेगळ्या कपाटांमध्ये टाकाल. तर त्या कपाटाला तुम्ही नाव द्या. म्हणजे त्या folder ला नाव द्यायचं. आणि प्रत्येकवेळी जो जिन्नस save कराल तो त्याच कपाटात तुम्ही सेव करायचा आहे.

Backup अर्थात तुमचं अतिरिक्त, सुरक्षित कपाट!

नॉर्मली कायं होत, बहुतेक करून, मी पाहिलंय असं, कि computer  वर काम करणारी जी मंडळी असतात, हि मंडळी साधारणपणे सगळच्या सगळ जे काही सेव करतात ते एक तर “My Document” नावाच्या एका folder मध्ये save करतात किंवा desktop वरती save करतात. तर याने काय होत कि आपल्याला परत जेंव्हा हे document शोधायचं असेल तेंव्हा ते सापडतं नाही, हा त्यातला मोठा तोटा होतो. त्यामुळे तुम्ही save करताना हे अगदी योग्य ठिकाणी त्या त्या location ला करा. जरी त्रासदायक पडलं तरी. म्हणजे असं होऊ शकत computer वर काम करताना – या folder मधून त्या folder मध्ये, त्या folder मधून या folder मध्ये – असं आपल्याला वारंवार करत राहायला लागू शकत. परंतु यामुळे होत काय कि तुमची सवय घट्ट होत जाते कि आपल्याला काय काय करायचं. त्याचा दुसरा फायदा असा होतो कि आपल्याला ते सापडतं. बरोब्बर विषयवार ते कागदपत्र आपल्याला सापडतं. आणि याचा तिसरा फायदा असा आहे कि वेळोवेळी आपण याचा backup घेणार आहोत. Backup हि एक खूप मोठी सुविधा आहे. म्हणजे जर काही चुकून माकून बरवाईट घडलं, format तुम्ही ऐकलं असेल. किंवा virus लागला असं ऐकलं असेल आणि त्यातून तुम्ही केलेलं काम जे आहे ते सगळ नष्ट व्हायची शक्यता असते. तर ते नष्ट होऊ नये म्हणून, याच्याकरता आपण backup घेत राहू.

Backup हा अगदी आदर्शपणे म्हंटल तर एक्सटरनल ड्राईव external drive मिळतात ज्यात तुम्ही, external hard disk मिळते – 500GB किंवा 1TB, 2TB अश्यापण मोठ्यामोठ्या hard disk मिळतात. पण अगदी छोट्या स्वरूपात pen drive हि आपल्याला कळणारी अतिशय सोपी गोष्ट आहे. pen drive वर जर आपण विषयवार जर त्याचा backup घेत गेलो तरीसुद्धा आपल्याला फायदा असा होईल – कि आपण या आठवड्यात जे जे काम केलेलं आहे तेव्हढ्याच गोष्टीचा backup घेतला तर आपल्याला फायदा होऊ शकेल. अश्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. तर हे सगळ folder logic आपण डोक्यात ठेऊन पुढंच काम करणार आहोत. धन्यवाद.

Download Article

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews