शिक्षणवेध

इंटरनेट वरून प्रत्यक्ष कामे मिळविणे

फ्री लान्सर अथवा एखादी संस्था स्थापन करून इंटरनेट वरून काम मिळविण्यासाठी असलेल्या संकेत स्थलांपैकी एक अप वर्क’ (Upwork.com) ह्या साईट चा आपण आता थोडा अभ्यास करूयात. अप्वर्क ही साईट पूर्वी ओडेस्क (Odesk) ह्या नावाने चालत असे.

वरील चित्रांद्वारे तुम्हाला काम कसे मिळू शकते थवा तुम्ही काम कसे शोधू शकता याचा साधारण तुम्हाला अंदाज येईल. आपण आपले कौशल्य निवडून त्यानुसार कामे शोधू शकतो, त्याला आपली किंमत देवू शकतो. हि कामं मिळविताना सुरुवातीस त्रास होतोच. पण हाच तर त्या शिक्षणातला एक टप्पा म्हणून घ्यायला हवा. एखाद-दुसरे काम सहज म्हणून घेवून बघा. त्यानंतर तुम्हाला त्यात नक्की गती प्राप्त होईल.

सुरुवातीला थोड्या कमी किंमतीत कामे घ्यायला हरकत नाही.

ह्याकामांतसगळ्यांना सम-समान संधी असते. सुरुवात करताना अधिक नफा मिळविण्याकडे कल नसावा. तर आपली थोडी तरी विश्वासार्हता निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न हवेत. ही विश्वासार्हता तुमच्या कामांच्या “reviews” मधून निर्माण होईल. हे एकदम एका दिवसात होत नाही , ह्याकरिता थोडी वाट बघायला लागेल, थोडी कामे करावी लागतील. कामे झाल्यावर ग्राहकांना रिव्ह्यू द्यायला उद्युक्त करावे लागेल. तसं इंटरनेट वर काम झाल्यावर लोक चांगलाच रिव्ह्यू देतात, तरीही आपणही त्यांना सांगायला हवेच. हे  रिव्ह्यू हीच खरी कामं मिळवताना नंतर कामी येणारी दौलत असते. त्यामुळे सुरुवातीला कमी किंमतीत कामे घ्यायला हरकत नाही. एकदा का तुमच्या कामाची बऱ्यापैकी “हिस्टरी” निर्माण झाली, की मग काय? जग तुमचच आहे.

सुरुवातीला छोटी-छोटी पण जास्त कामे घ्या.

जरी तुम्ही खूप मोठी मोठी व गुंतागुंतीची कामे करू शकत असाल, तरीहीसुरुवातीला जरा लहान-लहान म्हणजे खरं म्हणजे लवकर संपणारी कामेच अधिक घ्या. प्रत्येक कामानंतर रिव्ह्यू घेत चला, म्हणजे तुमच्या रिव्ह्यूज ची “संख्या” वाढेल. रिव्ह्यूज चा “स्कोर” म्हणजेच “स्टार रेटिंग” उत्तम राहील ह्याची तुम्ही काळजी घ्यालच कारण तुम्ही तुम्ही ज्यात कुशल आहात असेच काम निवडताय ! लवकर लवकर संपणारी कामे घेतलीत, म्हणजे रिव्ह्यू सुद्धा अधिक मिळत जातील तसेच तुमचा अर्थ-फलकही हलता राहील.

 

संपूर्ण कामादरम्यान असणारा ग्राहक-संपर्क (Communication)

अत्यंत महत्त्वाचे. ह्या कामांच्या दरम्यान ग्राहकांशी तुम्हाला सतत संपर्कात राहावे लागेल. ह्याकरिता skype chat, google hangout, whatsapp इत्यादी माध्यमे वापरली जातात. हा संपर्क सतत सतर्क ठेवा. तुम्ही 24 X 7 online असायला पाहिजे असं अजिबात नाही, पण ठरलेल्या वेळा अचूक पाळा. परदेशी ग्राहकांना शिस्तप्रियता खूपच आवडते.

टाईम लाईन” घट्ट पाळा

टाईम लाईन म्हणजे एखाद्या कामाच्या पूर्ततेकरिता दिला गेलेला वेळ. ही पाळणे अतिशय महत्त्वाचे. एखाद्या वेळेस पुढे मागे होणार असेल, तर स्पष्ट कल्पना द्या. पणहयगय करू नका. एखाद्या छोट्याशा हलगर्जीपणामुळे काम जायला नको. तुमच्याकडे येणारा कामाचा ओघ हा ह्याकारणाने कमी होऊ शकतो,कारण काम न देणारा ते का दिलेलं नाही, हे सांगत नाही.

प्रत्येक कामाचे एक “प्रोजेक्ट” तयार करून Portfolio ला जोडा.

Portfolio म्हणजे काय, तर तुमच्या कामांचा लेख-जोखा. प्रत्येक कामाचे तपशील, ते पूर्ण झाल्याची तारीख, स्क्रीन शॉट वगैरे राखत गेलात, तर हा एक चांगला रेफरन्स होऊ शकतो. हा तपशील त्या त्या Outsourcing पोर्टल्स वर तसेच वेब साईट, सोशल मिडीयावर जरूर ठेवत चला. हेच तुमचे कमी अधिक “प्रोजेक्ट्स” असतील.

सुरुवात करा, बस्स..!

आधी पासून तयारी करणं चांगलंच हो, पण इतकीसुद्धा तयारी नको, की तो कामाचा संवेगच (momentum) निघून जाईल. सुरुवात करा, वाटेत येणाऱ्या अडचणी येतील तशा सुटत जातील.

Have any Question or Comment?

2 comments on “इंटरनेट वरून प्रत्यक्ष कामे मिळविणे

Sunil Khopkar

Thank you very much Sir, for your valuable guidance in the workshop held by MCED, Pune.
While visiting joywebservices.com , I came across this page i.e. how to get work on internet. I am very happy to say that , it is very helpful for me. Just now I have registered myself on upwork.com as a freelancer. Hoping to get more guidance, suggestions fro you in future. Once again thank you n MCED so much.

Reply
S M Ghotikar

Dear Sunil,

Greetings.

Happy to know that my sharings helped you. Keep it up. Wish you a happy new year in advance .

Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews