आता शेतकऱ्यांनाही व्हावे लागेल इ-शिक्षित

सध्याच्या सरकारच्या “डिजिटल इंडिया” च्या घोषणेपासून अनेक क्षेत्रांत अमुलाग्र बदल होऊ लागलेत. कृषी क्षेत्र त्यातीलच एक. अजूनही जवळजवळ ७०% जनता ही शेतीवरच अवलंबून असल्याने ह्या क्षेत्रांत म्हणजे प्रामुख्याने ग्रामीण भागात आता “इ-शिक्षित” होणे अनिवार्य होवून बसलंय.

राष्ट्रीय कृषी बाजार ( National Agriculture Market – N.A.M.)

शेतमाल हा प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत म्हणजे मार्केट यार्डातून जास्तीत जास्त विकला जातो. ह्यांत दलालांचे खूप प्राबल्य असते. तेच भाव ठरवतात , संघटीत होतात आणि शेतकरी मात्र उलटपक्षी असंघटीत असतो, गांजलेला असतो, त्यामुळे दलालाने त्याला दिलेला भाव व प्रत्यक्ष ग्राहकाने दलालास म्हणजेच विक्रेत्यास दिलेला भाव ह्याच्यात प्रचंड तफावत असते. दलाल, अथवा तत्सम यंत्रणा कशी आवश्यक आहे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. परंतु शेतकऱ्यास जर आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना असेल, तर त्यासाठी आता सरकारही धावून आले आहे.

राष्ट्रीय कृषी बाजार ह्या संकल्पनेखाली शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यातील सर्व समित्या आता इंटरनेट ने जोडल्या जातील. प्रथम १२ राज्यांत हा प्रयोग राबविला जाईल, त्यांत महाराष्ट्र आहे. सर्वप्रथम कर्नाटक राज्याने ह्यात बाजी मारली व २-३ वर्षांपासूनच हे सुरु केले. त्याचे फायदेही सह-अवकाश मिळतच आहेत. प्रत्येक समितीला ३० लाख रु अनुदान देण्यात येत आहे. ह्यामुळे कोणत्या समितीत कोणत्या मालाला किती भाव आहे, हे लगेचच कळेल, शेअर मार्केट प्रमाणे. म्हणजेच शेतकऱ्याला कुठे त्याचा शेत माल विकायचा हे ठरवता येईल.

स्वयंचलित हवामान केंद्रे  (Automated Weather Station – A.W.S.)

राज्यात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या साधारण ५० एक केंद्रांच्या यशानंतर एकदम २०६५ केंद्रं उभ्रण्यात येणार आहेत. आगामीपेरण्या, तसेचशेत विम्या अंतर्गत द्याव्या लागणाऱ्या अचूक भरपाईसाठी व त्यात होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी ही केंद्रं हवामानाचं अचूक निदान देतात. असं केंद्र राज्यात प्रथम नाशिक जवळ सय्यद पिंपरी ह्या गावानं सुरु केलं. अर्थात त्याची फळेही सदर गावे चाखतच आहेत.

इ-लर्निंग कसे अनिवार्य

वरील दोन उदाहरणांमध्ये जी काही यंत्रणा बसवण्यात येईल, ती वापरून त्याचा उत्तम प्रकारे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यालाही आता संगणक साक्षर अर्थात इ-प्रशिक्षित व्हावच लागेल. स्मार्ट फोन तर तो वापरतोच (whatsapp ने लावलेलं वेड), त्यावरही अनेक कंपन्यांच्या Apps वापरून कार्य सुलभ होऊ शकते. त्यासाठी त्याला जुजबी इ-प्रशिक्षण घ्यावे लागेल, अथवा त्याच्या मुलांची तरी मदत घ्यावी लागेलच. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण देशपांडे (अंकोली) ह्यांनी म्हटल्याप्रमाणे आता शेतकऱ्याचा एक हात मातीत असेल; तर दुसरा हात संगणकाच्या की-बोर्ड वर असेल. असायला हवा. नाहीतर तो ह्या दुष्काळ-आत्महत्या ह्या दुष्टचक्रांतून सुटणारच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *