शिक्षणवेध

आउट सोर्सिंग– छोट्याशहरांना संधी !

आयटी म्हणजे च (अजून तरी)

नुकताच बंगलोर म्हणजेच आता बेंगलुरूला व्यवसायाच्या निमित्ताने जाऊन आलो. म्हणजे बऱ्याचदा जावं लागतंच. कारण बंगलोर म्हणजे आय.टी. उद्योगाची मक्का. इथे आयटी कंपन्यांचं प्रचंड जाळं आहे. त्यामुळे सतत ये-जा असतेच. माझ्या ह्या नवीन म्हणजे २००९ सालापासूनच्या नव्या उद्योगामुळे मी आता बंगलोरला नव्या कारणाने ये-जा करत असतो. माझा पारंपारिक उद्योग-यंत्रसामुग्रीचा-तेव्हाही मी यायचोच, पण आता कारणं जरा वेगळीच आहेत.

हे सगळं खास नमूद करण्याचं विशेष कारण म्हणजे ह्या गेल्या १० एक वर्षात ह्या शहरात घडणारे बदल मी पाहत होतो.कारण इथे फरक पडलाय तो आयटी उद्योगामुळेच – ह्याबद्दल दुमत नसावं. मी बंगलोरला गेलो की, बस स्थानकाजवळ “majestic” ह्या भागातच राहतो. बऱ्यापैकी “मार्केट” विभाग आहे हा.इथेही सध्या बरेच परदेशी नागरिक बघायला मिळताहेत. तसं बंगलोर सतत पर्यटकांचं आकर्षण राहिलेलं आहेच. पण ही मंडळी तशी पर्यटक वाटत नव्हती. माझं कुतूहल वाढल्याने मी थोडी चौकशी करायला सुरुवात केली.

बहुतेकजण आयटी संदर्भात कामे करीत आहेत

काही मंडळी आयटी कंपन्यांत चक्क नोकऱ्या करताहेत. पगारात बराच “राईज” मिळाल्यामुळे असतील कदाचित, पणमला दोन मुली भेटल्या-साधारणत: ३०-३२ वयोगटातल्या असतील. अमेरिकन. त्यांनी चक्क इथे स्टार्ट-अप चालू केलीये म्हणे. आणि त्यांच्या माहितीनुसार असे बरेच परदेशी आहेत, जे बंगलोर मध्ये येवून असे उपक्रम राबवत आहेत. कारण अर्थात भारतात तुलनेने अत्यंत स्वस्तात मिळणारे मनुष्यबळ. हेच प्रमुख आकर्षण असणार.तसं बघितलं तर भारतात चालणारं सगळं आयटी क्षेत्रातलं काम हे ह्याच कारणाने चालतं. “आउट सोर्सिंग” असं म्हणतात ह्या प्रकाराला.

आउट सोर्सिंग– कोण सेवा देतं-घेतं

फक्त मोठ्या मोठ्या कंपन्याच आउट सोर्सिंग करतातअसं काही नाही बरका. अगदी छोटी छोटी कामं सुद्धा ( एक-दोन-पाच-दहा डॉलर ची ) आउट सोर्सिंग माध्यमातून करून घेता येतात. अर्थात, करून देताही येतात. इंटरनेट जगतात अशाही काही कंपन्या असतात ज्या काही फ्री लान्सर्स त्यांच्या पदरी बाळगतात व एजन्सी स्वरूपात कामे घेतात व पूर्ण करून देतात.

अशा कामांची यादी, फ्री लान्सर्स, म्हणजेच कामांची यादी देणारी संकेत स्थळे आहेत, जेथे आपण आपले काम नोंदवू शकतो, तसेच आपण जर का सेवा देणारे असू, तर आपल्या सेवा नोंदवूही शकतो.

साधारणत: ह्यात खालील पक्ष गुंतलेले असतात :-

  • सेवा मागणारे
  • सेवा देणारे
  • हे संकेत स्थळ “manage” करणारे

व्यवहार कसा चालतो ?

सेवा मागणारे त्यांना “काय काम करून हवे आहे” हे तपशीलवार टाकतात. उदा. एक पॉवर point प्रेझेन्टेशन करून हवंय, किंवा एक्सेल मध्ये डेटा भरून हवा आहे, वेब साईट मध्ये बदल करून हवाय वगैरे वगैरे. सदर कामे क्रमवार ह्या संकेत स्थळांवर त्यांच्या त्यांच्या वर्गवारी (category) प्रमाणे नोंदली जातात. ती कामे पाहून सेवा देणारे त्या कामांचा अभ्यास करून त्यांचे दर टाकतात. त्यातून सर्वोत्कृष्ट (सेवा मागणाऱ्याला वाटणारे) असा सेवा देणारा निवडला जातो. काम संपले कि त्याचे पैसेही दिले जातात. अशा प्रकारे व्यवहार पूर्ण होतात.

 

हे संकेत स्थळ “manage” करणाऱ्यांना काय मिळते ?

ह्या व्यवहारातून सेवा घेणाऱ्या देणाऱ्याकडून १०% पैसे काही साईट घेतात. पण त्या बदल्यात सुरक्षित व्यवहाराची खात्री देतात, त्यांच्याकडे “रिव्ह्यू” पद्धत असते, त्यामुळे दोन्ही पक्ष लबाडी करत नाहीत, करू शकतच नाहीत. कारण दोन्ही पक्ष एकमेकाची निवड शेवटी “रिव्ह्यूज” वरूनच करीत असतो. त्यामुळे “रिव्ह्यू” चांगले मिळण्यासाठी सगळे धडपडत असतात. अर्थात ह्यातही काही “कलाकार” असतातच. चालायचंच. उडदामाजी…..

दोन प्रकारची कामे

साधारणत: दोन प्रकारची कामे दिली जातात.

  • प्रकल्प पद्धतीची: पूर्ण काम व त्याचे पैसे ठरवले जातात. आगाऊ काही रक्कम , तसेच प्रकल्प संपल्यावर उर्वरित, अथवा दोन्ही पक्ष मान्य करतील अशा अटींवर.
  • तासावर: काही कामांत काम करत राहायचे असते, ठाऊक नसते, की कालावधी किती लागेल. अशा वेळी, तासाच्या बोलींवर कामे दिली-स्वीकारली जातात.

विविधसेवा देणारे विविध दर टाकतात.अगदी “एक डॉलर” इतका अल्प दरही देतात व कामे घेतात. अर्थात, कामे देताना विचार करूनच दिली जातात. तो विषय वेगळा.

अशी सेवा मिळणाऱ्या काही साईट्स (संकेत स्थळे)

  • अप वर्क (upwork.com)
  • गुरु (.com)
  • फ्री लान्सर (freelancer.com)
  • इलान्स (Elance.com)

ह्या काही साईट्स आहेत. शिवाय आणखीही शोधायला “गुगल” आहेच की ! बहुतेक या साईट्स वापरायला मोफतच असतात. गम्मत म्हणून एखादा जॉब टाकून बघा. काही तासातच प्रतिक्रिया यायला लागतात.

 

यातली छुपी संधी

यात सेवा देणारे खूपच लोक फिलिपाईन्स, बांगला देश तसेच भारत ह्या देशातील आहेत. छोट्या छोट्या गावातील लोकांनाही अशी कामे करून देता येतील. कारण अगदी कोणत्याही प्रकारची कामे करून घेतली जातात. तुमच्याकडे एक संगणक तसेच एक इंटरनेट कनेक्शन असले की झाले. तुमच्या वेळेनुसार, मर्जीनुसार काम करता येवू शकतं, करून घेताही येवू शकतं. त्याकरिता बेंगलुरू ला जायची आवश्यकता नाही. कोठूनही – मग ते परभणी जवळचं पायथरी असो; की सांगली जिल्ह्यातलं कवठे महांकाळ असो.

मग, घेताय ना ही संधी ?

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews