Udyojakउद्योजक

अॅफिलिएट मार्केटिंग : घरबसल्या मार्केटिंगची सुरेख संधी !

Download Article

अॅफिलिएट मार्केटिंग

प्रथम “अॅफिलिएट मार्केटिंग” म्हणजे नक्की काय ते पाहूयात. अॅफिलिएट ह्या शब्दाचा अर्थ एखाद्या संस्थेशी संलग्न असणे असा होतो. अनेकदा आपण शैक्षणिक संस्थांशी संबंधित हा शब्द ऐकतो. अर्थात आपण येथे वेगळ्या संदर्भाने हे वापरत आहोत.  अॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे एखादे उत्पादन किंवा त्यांच्या सेवा आपण विकायच्या व त्याचा मोबदला म्हणून आपण “कमिशन” मिळविणे असा होय.

थोडक्यात, आपण त्या त्या उत्पादना पुरते किंवा सेवेपुरते त्यांच्याशी संलग्न होतो. ह्या प्रकारे आपण पारंपारिक पद्धतीनेही काम करत असतोच. उदा: एखाद्या कंपनीचे अधिकृत विक्रेते असतात, फ्रॅंचायझी नेटवर्क असते; तसेच. हे विक्रेते अथवा फ्रॅंचायझी त्या त्या कंपन्यांची उत्पादने अथवा सेवा विकून देतात, त्याबदल्यात त्यांना काही ठराविक मोबदला मिळतो. अॅफिलिएट मार्केटिंग मध्येही मूळ कल्पना हीच आहे, फक्त माहिती तंत्रज्ञान वापरल्यामुळे ह्याची व्याप्ती प्रचंड वाढते, तसेच असंख्य लोकांना संधी मिळू शकते, तेही अगदी कमी साधनं वापरून.

अॅफिलिएट मार्केटिंग कसे चालते?

अॅफिलिएट मार्केटिंग मध्ये एक भाग असतो उत्पादक किंवा ज्याला विकायचं आहे तो (Vendor). दुसरा असतो प्रत्यक्ष विकणारा (अॅफिलिएट), तर तिसरा म्हणजे ह्या देवघेवी करिता जागा (वेबसाईट), साहित्य (tools) उपलब्ध करून देणारी एखादी संस्था म्हणजे कंपनी (platform provider). vendor चा अॅफिलिएट बरोबर ठराविक कमिशन मिळण्याबाबत एक करार झालेला असतो, त्यानुसार अॅफिलिएट ने vendor चा माल विकला की, अॅफिलिएटला कमिशन मिळते. ह्या सर्व व्यवहारात कंपनी म्हणजे platform provider सर्व देखरेख ठेवते. दोन्ही पक्षांची व्यवस्थित काळजी घेतली जाते.

 

अॅफिलिएट मार्केटिंग कसे सुरु करता येईल ?

मुळात, अॅफिलिएट मार्केटिंगचे वैशिष्ट्य असे, की हे कुणालाही, कधीही आणि अगदी कमीत कमी साहित्यात सुरु करता येते. फक्त एक संगणक, त्याला एक चांगले इंटरनेट कनेक्शन असले की झाले. सुरुवातीला अगदी आपलाच संगणक हवा असा काही आग्रह नाही,  परंतु असल्यास चांगलेच. कारण कोणत्याही व्यवसायाकरिता प्राथमिक गुंतवणूक ही करावीच लागते. तरी प्रत्यक्ष दुकान, कार्यालय वगैरे ह्यांच्या मानाने ही काहीच नाही. अर्थात आणखीही काही गोष्टी लागतील, पण प्रचंड खर्चिक काही नाही. संदर्भाने येतच राहील.

अॅफिलिएट मार्केटिंग Platform पुरविणाऱ्या संस्था

तुम्ही जर फक्त digital उत्पादने विकणार असाल, उदा. ebooks किंवा Video कोर्सेस, softwares वगैरे, तर clickbank ही एक अतिशय उत्तम अशी साईट आहे. प्रत्यक्ष वस्तू उदा. मोबाईल, कपडे, पुस्तके, खेळणी किंवा काही साहित्य विकणार असाल तर आता भारतात असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे Amazon.in ही वेब साईट, जोडीला flipkart, ebay ह्यादेखील sites आहेत.

तुम्हाला हव्या त्या कंपन्यांच्या बरोबर तुम्ही एकाच वेळी काम करू शकता, एकाच वेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (physical-digital) वस्तू-सेवा विकू शकता. ह्या कंपन्या सर्व विक्री साहित्य पुरवितात उदा. एक लिंक असते, ज्या द्वारे कोणी खरेदी केल्यास तुम्हाला कमिशन मिळेल. ती लिंक, किंवा banners वगैरे. हे सर्व शक्यतो त्या त्या कंपन्या पुरवितात. तुम्ही सदर लिंक किंवा banner तुमच्या वेब साईट वर (असेल तर) प्रकाशित करायचा किंवा इमेल द्वारे एखाद्याला पाठवायचा, त्याने अथवा तिने त्याद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला ठरलेल्या दराने कमिशन मिळून जाते, म्हणजे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होते.

कमिशन जमा होण्यास लागणारा वेळ

कंपनी टू कंपनी हे धोरण वेगवेगळे असते. पण साधारण physical goods कंपन्या ह्या ग्राहकाला माल सुस्थितीत मिळाल्यावर कमिशन देतात, तर clickbank सारखी digital goods कंपनी मात्र लगेचच देवून टाकते. physical goods कंपन्या साधारण २% ते १५% इतके तर digital goods कंपन्या २५-७५% कमिशन देतात. अर्थात असे असले तरीही प्रत्यक्ष पैसे खात्यात यायला वेळ लागू शकतो, कारण त्या त्या कंपनीचा एक “पेमेंट threshold” असतो; म्हणजेच अमुक एक रक्कम कमिशन म्हणून जमा झाल्यावरच ते तुमच्या खात्यात जमा करतात.

बँक खाते

वर म्हटल्यानुसार, हा सगळा प्रकार तसा अगदी कमीत कमी वेळात, खर्चात चालू करता येतो. हे सर्व कमिशन जमा होण्याकरता एक बँक खाते मात्र लागेलच. व्यवसाय करताय, तर चालू खाते की व्यक्तिगत खाते, हा निर्णय मी तुमच्यावरच सोडेन. परंतु सुरुवातीला घडी बसेस्तोवर किंवा अनिश्चितता असल्यास व्यक्तिगत खात्यानेच सुरुवात करा. मुळात ह्या कंपन्यांबरोबर तुम्हाला एक खाते उघडावे लागेल, त्यात बँक खात्याचे तपशील द्यावे लागतात.  तेव्हाही बाब महत्त्वाची ठरेल.

इतर बाबी

मुळात ज्यांना त्यांची उत्पादने विकायची आहेत अशी माणसे, कंपन्या कुठे शोधायच्या? तर ह्याच करिता ह्या platform पुरविणाऱ्या संस्था किंवा कंपन्या असतात. त्यांच्याकडे अशा असंख्य वस्तू विक्रीकरिता उपलब्ध असतात. आपण ह्या platform पुरविणाऱ्या कंपन्यांकडे एक खाते उघडायचे, जे विनामूल्य असते (बहुतेक वेळा). त्याकरिता काही मूळ कागदपत्रे लागू शकतील, उदा तुमचे बँक खाते, इमेल आयडी वगैरे. अगदी जुजबी असतात ही. त्या बाबी पूर्ण झाल्या ( शक्यतो तिथल्या तिथे-लगेचच होतात त्या). बस, त्या त्या साईट वर जा (उदा. क्लिक बँक), असंख्य वस्तू त्यावर उपलब्ध असतात, त्यातली तुम्हाला विक्री योग्य  एखादी वस्तू निवडा. त्याची लिंक तुमच्याकडे घ्या (फक्त तुमचीच असते ती), आणि लागा कामाला. इतकं सोप्पं आहे हे.

जस जसे तुम्ही ते उत्पादन लोकांना इमेलद्वारे, वेब साईटद्वारे लोकांना सांगू लागता, त्यावरुन एखाद्याने ते घेतले, की लगेच तुम्हाला कमिशन लागू होते. तुमच्या पेमेंट threshold प्रमाणे तुमच्या खात्यात जमाही होऊ लागते.

 

हे सर्व करायला वेब साईट आवश्यक आहे का ?

असल्यास खूपच उत्तम. म्हणजे अनेक कंपन्यांची विविध उत्पादने तुम्ही एकाच वेळी विकू शकाल. तसेच वेब साईट असेल, तर आप-आपले एक विशिष्ट नाव, वर्तुळ व्हायला लागते  आणि वेब साईट करणे काही अवघड नाही. अगदी बेसिक साईट सुद्धा चालेल ह्याकरिता. म्हणजे ५-१० हजारात होणारा कार्यक्रम आहे हा. सर्व खर्चाची उजळणी करून बघू या:

  • laptop किंवा संगणक  रु. ३०,०००
  • डोंगल (फिरते इंटरनेट) रु.  २,०००
  • बँक अकौंट                 रु.  ५,०००
  • वेब साईट                   रु. १०,०००
  • इतर किरकोळ खर्च      रु.  ३,०००

                                         ========

                                  रु ५०,०००

भांडवली खर्च बघितला तर साधारण ५०,००० रु. मध्ये हा व्यवसाय सुरु होऊ शकेल. शिकण्यासाठी मात्र वेळ द्यावाच लागेल. चुकायचे, शिकायचे, पुन्हा चुकायचे, शिकायचे असे थोडे होईल. परंतु ह्या करिता वेळेचे बंधन नाही, वयाची अट नाही, काळाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही, जात-पात नाही, फक्त तुमची इच्छा हवी !

Download Article

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews